उन्हाळ्यात जवळपास प्रत्येकजण कुठेतरी फिरायला जातो. कोणी समुद्रकिनारी, कोणी हिल स्टेशन तर कोणी धबधब्यांचा आनंद लुटण्यासाठी. पण कधी कधी अशा ठिकाणी काही घडते ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. असाच काहीसा प्रकार एका व्यक्तीसोबत घडला. जो आधी मस्त धबधब्याचा आनंद घेत होता. पण नंतर त्याला समजले की एक साप त्याच्या जवळ आला आहे. त्यामुळे तो लगेच तिथून पळून आपला जीव वाचवतो. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ काही दिवसांपासून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे.

इन्स्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक माणूस धबधब्याखाली असून त्याचा आनंद घेत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, मध्येच धबधब्याच्यावरून येणारा एक साप त्या माणसाजवळ येतो. आधी त्या व्यक्तीचे लक्ष सापाकडे जात नाही. मात्र साप पडताना पाहून तेथे उपस्थित लोक आवाज करू लागले. आवाज ऐकून माणूस आधी लोकांकडे पाहतो, मग त्याचे लक्ष सापाकडे जाते. त्याला धोका असल्याची जाणीव होताच. तो लगेच तिथून पळून आपला जीव वाचवतो.

आणखी वाचा : लग्नाच्या रिसेप्शन पार्टीमध्ये अमिताभ बच्चन यांना पाहून माधुरीचे पती डॉ नेने, म्हणाले “मी यांना…”

आणखी वाचा : अ‍ॅपल वॉच, आयफोन आणि हिऱ्यांची अंगठी; नेहा कक्करचा पतीचं लाखो रुपयांचं सामान हॉटेलमधून गेलं चोरीला

हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. यासोबतच लोक यावर मजेशीर कमेंटही करत आहेत आत्तापर्यंत हा व्हिडिओ १९ लाखांहून अधिक लोकांनी पाहिला आहे. त्याच वेळी, १ हजारांहून अधिक लोकांनी व्हिडिओला लाईक केले आहे.