scorecardresearch

…अन् चक्क सापाने मारली माकडासारखी उडी, IAS अधिकाऱ्याने शेअर केलेला Video पाहून नेटकरी झाले थक्क

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सापाने घराच्या पत्र्यावरुन उंच उडी मारल्याचं दिसत आहे

snake jumping from a height
सोशल मीडियावर सापाचा असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. (Photo : Twitter)

सोशल मीडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडीओ लोकांना हसवणारे असतात तर काही अंगावर शहारे आणणारे असतात. यामध्ये काही मुक्या प्राण्यांमधील वेगवेगळे गुणधर्म दाखवणारेही व्हिडीओ असतात. आतापर्यंत आपण अनेक जंगली प्राण्यांचे उड्या मारतानाचे, माणसांवर हल्ला करतानाचे व्हिडीओ पाहिले आहेत. या प्राण्यांसोबत सापांचे व्हिडीओही आपणाला पाहायला मिळतात.

सापाचे नाव ऐकताच लोक घाबरुन जातात कारण चुकून सापाने आपणाला दंश केला तर जीव जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अनेकजण सापांना घाबरुन असतात. जगभरात सापांच्या हजारो प्रजाती आहेत, ज्यामध्ये काही विषारी तर काही बिनविषारी असतात. वेळोवेळी त्यांचे अनेक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

हेही पाहा- Video: नशा उतरवण्यासाठी बायकोने नवऱ्याला पाण्यात नेलं आणि असं काही केलं जे पाहून पोट धरून हसाल

पण सध्या सोशल मीडियावर सापाचा असा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हो कारण व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये सापाने घराच्या पत्र्यावरुन उंच उडी मारल्याचं दिसत आहे. जे पाहून अनेकजण हा साप मागील जन्मी माकड किंवा मांजर असेल्याचं म्हणत आहेत. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल यात शंका नाही.

आयएएस अधिकाऱ्याने शेअर केला व्हिडिओ –

हेही पाहा- Video: दारुच्या नशेत रिक्षाचालकाने समोर येईल त्या वाहनाला दिली धडक, पोलिसांसमोर घडली धक्कादायक घटना

माकडासारखी उडी मारणाऱ्या या सापाचा व्हिडिओ आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी कॅप्शनमध्ये ‘अविश्वसनीय’ असं लिहिलं आहे. केवळ ६ सेकंदांचा हा व्हिडिओ ९ लाख ५० हजारांहून अधिक वेळा पाहिला असून हजारो यूजर्सनी या व्हिडिओला लाईक केलं आहे. तर अनेकांनी या व्हिडीओवर मजेदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, ” ही इच्छाधारी नागीन आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-02-2023 at 21:02 IST