Snake Mirror Video Viral : सापाला पाहून भल्याभल्यांना घाम फुटतो, त्यामुळे माणूसचं नाही तर प्राणी देखील त्यापासून अंतर ठेवून राहतात. पण काहीजण सापाबरोबर वेगवेगळे स्टंट करताना दिसतात. अशाच एका स्टंटमध्ये सापाला चक्क आरसा दाखवण्यात आला. यावेळी तो असा काही चवतळला की पाहून तुम्हाला धडकी भरेल. या थरारक दृश्यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये एक साप काचेच्या बॉक्समध्ये बंद असलेला दिसत आहे. यावेळी त्याच्यासमोर अचानक एक आरसा ठेवला जातो, त्यानंतर सापाची जी प्रतिक्रिया समोर येते ती पाहून तुम्हीही अवाक व्हाल कोणी याला भीतीदायक म्हणत आहे, तर कोणी सापाच्या या वर्तनाबद्दल तर्कवितर्क लावत आहे.

सापाला आरशात दिसला दुसरा साप

व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसते की, जसा सापाच्या समोर आरसा ठेवला जातो, तसा तो आरशात दिसणाऱ्या स्वतःच्याच प्रतिबिंबाला दुसरा साप समजतो. काही क्षणांतच त्याची देहबोली (बॉडी लँग्वेज) पूर्णपणे बदलते. साप चवताळतो आणि फणा काढून आरशावर सतत हल्ला करू लागतो. दंश करत विष ओकून साप काचेत दिसणाऱ्या प्रतिबिंबाला दुसरा साप समजून हल्ला चढवतोय. अनेकदा काचेवर तो इतका जोरदार हल्ला करतो, जणू समोर असलेल्या शत्रूला संपवूनच टाकायचे आहे. त्याचा हल्ला करण्याचा वेग पाहून तुमचाही थरकाप उडेल.

युझर्सच्या मजेशीर प्रतिक्रिया

या व्हिडिओवर नेटिझन्सनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. एका युझरने लिहिले, “हा तर स्वतःच्याच प्रतिमेवर सर्व विष ओकत आहे.” दुसऱ्याने म्हटले, “त्याने स्वतःच्याच प्रतिमेला शत्रू मानले.” एकाने गमतीने म्हटले, “मधे काच ठेवून स्वतःकडूनच स्वतःला चावा घ्यायला लावला.” एका परदेशी युझरने लिहिले, “प्लॉट ट्विस्ट: त्याने स्वतःलाच फायनल बॉस मानले.” याशिवाय अनेक लोकांनी मजेशीर GIF शेअर करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

साप असे का करतो?

तज्ज्ञांच्या मते, बहुतांश सापांमध्ये माणसांप्रमाणे आरशात स्वतःला ओळखण्याची क्षमता नसते. ते मुख्यत्वे गंध, जमिनीतील कंपने आणि सभोवतालच्या वातावरणावरून ओळखतात. अशा परिस्थितीत, आरशात दिसणाऱ्या स्वतःच्याच प्रतिमेला ते दुसरा साप किंवा संभाव्य धोका मानतात. याच कारणामुळे ते बचावात्मक किंवा आक्रमक रूप धारण करतात. अर्थात, कोणत्याही सापाचे वर्तन हे त्याच्या प्रजातीवर, सभोवतालच्या वातावरणावर आणि त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असते.