Snake outside dadar railway station: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल होत असतात. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे, जो कधीही, कुठेही लपून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. साप त्याच्या जबड्यापेक्षा मोठे भक्षदेखील गिळू शकतात, त्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये दादर रेल्वे स्टेशन परिसरात साप पाहायला मिळाला. यावेळी प्रवासी, रस्त्यावरचे विक्रेते आणि सर्वत घाबरले.
दादर रेल्वे स्टेशन परिसरात एक मोठा साप फिरत असल्याचं प्रवाशांच्या लक्षात आलं. साप दिसताना प्रवाशांमध्ये भीती पसरली. काही प्रवासी सापाला पाहून भयभीत झाल्याचंही व्हिडीओ पाहायला मिळत आहे. साप दिसताच प्रवाशांची पळापळ झाली. पण थोड्या वेळात एका सर्पमित्राने त्या सापाला पकडलं आणि सुरक्षितपणे एका पोत्यात भरलं. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
मुंबईतील महत्त्वाच्या स्टेशनपैकी एक असलेल्या दादर स्टेशनवर प्रवाशांची दररोज गर्दी उसळते. दादर रेल्वे स्टेशन मध्य रेल्वेचं केंद्रबिंदूच आहे. कारण दादरवरून अनेक एक्स्प्रेस गाड्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जात असतात. तसच दादर रेल्वे स्थानक पश्चिम रेल्वे स्थानकालाही जोडलेलं आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेने जाणऱ्या प्रवाशांची या स्थानकात मोठी वर्दळ असते. काल दादर रेल्वे स्थानकात झालेल्या दगडफेकीच्या घटनेमुळे एक महिला प्रवासी गंभीर जखमी झाली होती. अशातच आज पुन्हा एकदा दादर रेल्वे स्टेशन परिसरात नागरिकांमध्ये घबराट पसरल्याचं पाहायला मिळालं.
पाहा व्हिडीओ
व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
हा व्हिडीओ @viralmedia70 नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, “हे भयानक आहे”, तर सापाचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
