Snake viral video: सोशल मीडियावर सापांचे अनेक व्हिडीओ रोज व्हायरल झाले आहेत. साप हा शब्द जरी उच्चारला तरी अंगावर काटा येतो. साप हा असा सरपटणारा प्राणी आहे जो कधीही कुठेही लापून बसू शकतो. गावात किंवा जंगलाच्या आजूबाजूला असलेल्या मानवी वस्तीत साप हमखास पाहायला मिळतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना सापाची भीती वाटते. सोशल मीडियावर सापाचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून अंगावर शहारा येतो. सध्या सांगलीमधून असाच एक सापाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशात एक साप अशा ठिकाणी अडकून बसला की तुम्ही विचारही करु शकत नाही. सांगलीतील आकाशवाणीजवळ एक साप चक्क डांबरात अडकलेला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सांगलीमध्ये आकाशवाणीजवळ अत्यंत विषारी घोणस साप डांबरात अडकलेला आहे. डांबर किती चिकट असतं सर्वांनाच माहिती आहे, एकदा त्यात पाय पडला किंवा त्याला स्पर्श झाला तर लवकर आपण हात किंवा पाय बाहेर काढू शकत नाही. असाच हा साप डांबरामध्ये अडकला आहे. बाहेर येण्यासाठी तो धडपडत आहे मात्र त्याला बाहेर येता येत नाहीये. यावेळी सर्पमित्रांनी आणि लोकांनी वेगवेगळे प्रयत्न करत सापाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, तेल लावून आणि पाईपच्या आधारे या सापाला बाहेर काढलं. त्यानंतर त्याच्या अंगावर लागलेल सर्व डांबर काढलं आणि सापाला अखेर जंगलात सोडलं.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ आता व्हायरल होत असून नेटकरी यावर संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने “अत्यंत विषारी व तेवढंच रागीष्ठ सर्प प्रजाती घोणस जो थोडक्यात यमराज” अशी प्रतिक्रिया दिलीय तर दुसऱ्यानं “याला वाचवणे म्हणजे लोकांचे प्राण धोक्यात घालणं” म्हंटलंय. तर आणखी एकानं, “चावला की दोन मिनिटांत माणूस मरतोय.त्याला वाचवून काय उपयोग” “अतिविषारी जातीतील घोणस जनावर”