Snake Viral Video: सोशल मीडियावर अनेक व्हायरल व्हिडीओ, फोटो आपण पाहतो. आज संपूर्ण देशभरात नागपंचमीचा सण साजरा केला जात आहे. त्यानिमित्ताने नागांसंदर्भातील अनेक किस्से, व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. सध्या एका सर्पमित्राने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे; ज्यात तो एक विषारी नाग पकडताना दिसत आहे. अनेकांच्या अंगावर काटा आणणाऱ्या या व्हिडीओला अनेक व्ह्युज आणि लाइक्सही मिळाल्या आहेत.

एखाद्या सापाचा फोटो जरी आपल्या डोळ्यांसमोर आला तरी आपली घाबरगुंडी उडते. नाग, मण्यार, अजगर या सापांमधील जातींना अनेक जण घाबरतात यात काही नवल नाही. काही महिन्यांपूर्वी परदेशातील एका अजगराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यात तो अजगर एका गाडीच्या मागच्या बाजूला अडकलेला दिसत होता. या व्हिडीओनंतर आणखी एका व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक नागीण आपल्या अंड्यांचे रक्षण करताना दिसली होती. दरम्यान, आता व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये असाच एक खूप भयानक नाग पाहायला मिळत आहे.

नक्की काय घडलं व्हिडीओमध्ये?

या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गावातील एका घरातील स्वयंपाकघराच्या छतावर नाग लपून बसला होता. घरातील सदस्यांना नाग असल्याची चाहूल लागताच त्यांनी सर्पमित्राला बोलावले. सर्पमित्र नागाला पकडण्यासाठी स्वयंपाकघरात जातो आणि घरातील व्यक्तीने दाखविलेल्या ठिकाणाहून लपलेल्या नागाला बाहेर काढतो. यावेळी तो नाग फणा काढून सर्पमित्राकडे पाहत असतो; पण सर्पमित्र न घाबरता, त्याला हातात पकडून एका बाटलीमध्ये बंद करतो.

हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @murliwalehausla24 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर आतापर्यंत १५ दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि चार लाखांहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

हेही वाचा: आरारा खतरनाक! ‘तौबा तौबा’ गाण्यावर परदेशातील चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO युजर्स करतायत कौतुक

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

या व्हिडीओवर एका युजरने लिहिलेय, “सर्पमित्र भाऊ तुम्ही घरंच देवस्वरूप आहात.” दुसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “भाऊ तुम्ही खरंच खूप ग्रेट आहात.” तिसऱ्या व्यक्तीने लिहिलेय, “किती भयानक नाग होता.” आणखी एका व्यक्तीने लिहिलेय, “तुम्ही असंच काम करीत राहा भाऊ.”