Viral video: भारतातील अनेक लोक प्रवासासाठी ट्रेनचा वापर करतात. कमी अंतर असो वा लांब, भारतीय रेल्वेचं जाळं सर्वत्र पसरलेलं आहे. रेल्वेनं प्रवास करणं सोयीचं आहे, मात्र थोडासा निष्काळजीपणाही ते तितकंच धोकादायक बनवतो. सोशल मीडियावर बऱ्याचदा अनेक विचित्र गोष्टी व्हायरल होतात. यातील काही दृश्य काळीज हेलावणारे असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे.

रेल्वेने प्रवास करताना लोकांना अनेकदा अनेक मार्गदर्शक सूचना दिल्या जातात. हे त्यांच्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी असतं. यामध्ये, चालत्या ट्रेनमध्ये चढण्यास आणि उतरण्यास मनाई आहे, हे लोकांना समजावून सांगितलं जातं. पण भारतातील लोक ऐकतात कुठे? तुम्ही अनेकदा लोकांना दरवाजात उभे राहताना पाहिले असेल, असंच दरवाजात उभे राहणे एका महिलेच्या अंगलट आलंय

Indian Railways Shocking Video
ट्रेनमध्ये ‘ही’ सीट चुकूनही कोणालाही मिळू नये, तिकीट असूनही प्रवाशाला सहन करावा लागतोय त्रास; Video पाहून संतापले लोक
12 December Rashi Bhavishya In Marathi
दुसरा गुरुवार, १२ डिसेंबर पंचांग: महालक्ष्मीच्या कृपेने मेषला…
shocking video : parents should take care of their children.
VIDEO : पालकांनो, तुमची मुले करू शकतात अशा चुका! चिमुकला अडकला लिफ्टमध्ये; पाहा, पुढे काय घडले?
Shocking video Boy sitting at a bus stop was hit by a bus video goes viral
बस स्टॉपवर बसलेल्या तरुणावर ड्रायव्हारने घातली बस; पुढे जे घडलं ते पाहून उडेल थरकाप; VIDEO पाहताना सावधान
viral video of desi jugaad
पायऱ्यांवरून सामान उतरवण्याचं टेन्शन दूर; ‘त्यानं’ शोधला असा जुगाड की… VIRAL VIDEO पाहून वाजवाल टाळ्या
Terrifying accident woman and child bus accident viral video
VIDEO: भयंकर अपघातात महिलेसह चिमुकल्याचा ‘असा’ वाचला जीव; बसमध्ये जे घडलं ते पाहून उडेल थरकाप
indian railways train video viral desi jugad video
१ नंबर जुगाड! ट्रेनमधील दरवाजाचा आवाज बंद करण्यासाठी प्रवाशाने वापरली अनोखी शक्कल; उशीचा केला ‘असा’ वापर, VIDEO VIRAL
Man jugaad for a seat in metro prank viral video on social media
सीट मिळावी म्हणून ओलांडली मर्यादा! तरुणाने भरमेट्रोत ‘असं’ काही केलं की महिलांनी जागाच सोडली, पाहा VIDEO

‘तो’ ट्रेनमध्ये चढला आणि पर्स घेऊन पळून गेला…

काही मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला आणि एक वृद्ध व्यक्ती ट्रेनच्या दरवाज्याजवळ उभे आहेत. ट्रेन संथ गतीने पुढे जात आहे. बाहेर सर्वत्र अंधार दिसत आहे. अचानक एक तरुण रुळावरून धावत येतो आणि ट्रेनच्या फूटबोर्डवर चढतो आणि तिथे उभ्या असलेल्या महिलेची पर्स हिसकावून पळून जातो. बाजूला उभा असलेला वृद्ध व्यक्ती कसेतरी स्त्रीला पडण्यापासून वाचवतो. व्हिडिओवर लिहिले आहे की, हे सीसीटीव्ही फुटेज फेब्रुवारी २०२० चे आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> ठाण्यात किचनच्या खिडकीतून घरामध्ये घुसला भलामोठा साप अन्…धडकी भरवणारा VIDEO व्हायरल

ही बातमी लिहेपर्यंत लाखो व्ह्यूज तर अधिक हजारो लाईक्स मिळाले आहेत. यावर शेकडो युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले ” पोलीस अशा लोकांना का पकडत नाहीत. भारतीय रेल्वेने स्वयंचलित दरवाजे सुरू करावेत, अशी सूचना काहींनी केली.” त्याचवेळी काही वापरकर्त्यांनी याला प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे म्हटले आहे. यावर तुमचे काय मत आहे? हे सुदधा आम्हाला सांगा..

Story img Loader