ट्रेनचा प्रवास हा सोपा आणि सोयीस्कर मानला जातो. पण कधी कधी ट्रेनमध्ये देखील अशा काही घटना घडतात ज्या आपल्याला हादरवून सोडतात. तुम्ही ट्रेनने प्रवास करताना स्टेशन येण्यापूर्वी दरवाज्याजवळ येऊन उभे राहता का? जर होय, तर हा व्हिडीओ एकदा पाहाच. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्ही चुकूनही दरवाज्याजवळ उभे राहणार नाहीत. या व्हिडीओत ट्रेनच्या दरवाज्याजवळ एक महिला आणि एक वृद्ध व्यक्ती उभे होते. ट्रेन संथ गतीने धावत होती. दरम्यान, एक तरुण चालत्या ट्रेनमध्ये चढला आणि महिलेची पर्स हिसकावून पळून गेला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे, जी पाहून लोक हादरून गेले आहे. चालत्या ट्रेनमध्येही चोरीच्या घटना घडल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘तो’ ट्रेनमध्ये चढला आणि पर्स घेऊन पळून गेला…

काही मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला आणि एक वृद्ध व्यक्ती ट्रेनच्या दरवाज्याजवळ उभे आहेत. ट्रेन संथ गतीने पुढे जात आहे. बाहेर सर्वत्र अंधार दिसत आहे. अचानक एक तरुण रुळावरून धावत येतो आणि ट्रेनच्या फूटबोर्डवर चढतो आणि तिथे उभ्या असलेल्या महिलेची पर्स हिसकावून पळून जातो. बाजूला उभा असलेला वृद्ध व्यक्ती कसेतरी स्त्रीला पडण्यापासून वाचवतो. व्हिडिओवर लिहिले आहे की, हे सीसीटीव्ही फुटेज फेब्रुवारी २०२० चे आहे.

loksatta analysis report on status of leopards in india
विश्लेषण : बिबटे वाढलेत… शेतात, गावच्या वेशीवर आणि सिमेंटच्या जंगलातही!
Jamtara Train accident
झारखंडच्या जामतारा स्थानकाजवळ मोठी दुर्घटना, रेल्वेची १२ प्रवाशांना धडक, दोन जणांचा मृत्यू
prabhas-london-house
‘या’ कारणासाठी आता प्रभास राहणार लंडनमध्ये भाड्याच्या घरात; भाड्याची रक्कम ऐकून व्हाल चकित
massive fire broke out in a slum in Bhayanders Azad Nagar
भाईंदरच्या आझाद नगर मध्ये झोपडपट्टीला भीषण आग, अग्निशमन दलाकडून नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू

येथे पाहा व्हिडिओ

( हे ही वाचा: Video: नदीच्या पाण्यात तोंड धुवत होती तरुणी, त्यानंतर जे घडलं…; तरुणीच्या कायम लक्षात राहील ‘हा’ क्षण)

हा व्हिडीओ NCIB Headquarters च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून २९ डिसेंबर रोजी पोस्ट करण्यात आला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले ”सावधगिरी बाळगा… ट्रेन थांबण्यापूर्वी दारापर्यंत येऊ नका, अन्यथा तुम्हीही अशा घटनेला बळी पडू शकता. ही बातमी लिहेपर्यंत १ लाखाहून अधिक व्ह्यूज आणि ४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर शेकडो युजर्स प्रतिक्रिया देत आहेत. एका व्यक्तीने लिहिले ” पोलीस अशा लोकांना का पकडत नाहीत. भारतीय रेल्वेने स्वयंचलित दरवाजे सुरू करावेत, अशी सूचना काहींनी केली.” त्याचवेळी काही वापरकर्त्यांनी याला प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे म्हटले आहे. यावर तुमचे काय मत आहे? हे सुदधा आम्हाला सांगा..