Sanke and Ant Video Viral रोजच्या आयुष्यात आपल्याला अनेकदा चांगले वाईट अनुभव येत असतात ज्यातून आपण बरेच काही शिकतो, स्वत:मध्ये सुधारण करतो आणि आयुष्यात पुढे जातो. अनेकदा लोक आपल्याला जाणून न घेताच आपल्याबद्दल मत तयार करतात आणि तेच सत्य मानून आपल्याशी वागतात. अनेकदा लोक आपल्या कमी लेखतात. पण प्रत्येकामध्ये काही नाही काही खास असते याचा विसर सर्वांना पडतो. एखाद्याबद्दलचे चुकीचे मत नातेसंबंध किंवा परिस्थिती खराब करतात किंवा आपल्याला संकटात टाकू शकतात म्हणूनच वडीलधारी मंडळी नेहमी आपल्याला सांगतात किंवा शिकवतात की, “कधीही कोणाला कमी लेखू नका.”
तुम्ही लहानपणी मुंगी हत्तीची गोष्ट ऐकली असेल. शक्तिशाली हत्तीला स्वत:च्या ताकदीचा गर्व असतो त्यामुळे तो सर्वांना कमी लेखत असतो. जेव्हा छोट्याशी मुंगीबरोबर त्याचा सामना होतो तेव्हा मात्र त्याला जन्माची अद्दल घडते. लहानशी मुंगी त्याच्या सोंडेत शिरते आणि कडकडून चावा घेते ज्यामुळे हत्ती जोरजोरात ओरडू लागतो. ही गोष्ट नेहमी आपल्याला आठवण करून देते की “इतरांना कधीही कमी लेखू नये” या म्हणीची प्रचिती देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका व्हिडीओमध्ये दाखवले आहे की, अजगर जेव्हा मुंग्याच्या वारुळामध्ये शिरतो तेव्हा काय होते.
व्हिडिओ पाहून अनेकांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. एवढी छोटी मुंगी अजगरासारख्या विषारी प्राण्याचा सामना कसा करेल असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हा व्हिडिओ पाहा. व्हिडीओमध्ये मुंग्या कोणत्याही संकटाचा सामना कसा करतात हे दाखवले आहे. व्हिडीओमध्ये सुरुवातीला एक किडा जेव्हा मुंग्याच्या कचाट्यात सापडतो तेव्हा क्षणार्धात सर्व मुंग्या त्याच्या भोवती गोळा होतात अन् क्षणार्धात त्याचा अंत होतो. त्यानंतर एक अजगर मुंग्याच्या वारुळामध्ये घुसण्याचा प्रयत्न करतो पण क्षणार्धात त्याचीही तीच अवस्था होते जी त्या किड्याची होते. अजगर सुरुवातीला हळू हळू सरपटत पुढे जाताना दिसत आहे. आधी काही मुंग्या त्याच्या अंगावर चढताना दिसतात तरी तो पुढे जात राहतो. जसजसा तो पुढे जातो तशा सर्व मुंग्या त्याच्या अंगावर चढतात आणि हल्ला करतात. क्षणार्धात अजगर तरफडू लागतो. मुंग्यापासून सुटका मिळवण्यासाठी तो प्रयत्न करतो पण त्याचा प्रयत्न अयशस्वी ठरतो. व्हिडिओ पाहून काळजाचा थरकाप उडत आहे. व्हिडिओमधील अजगर वाचला की नाही याबाबत खात्रीपूर्वक माहिती नाही.
हा व्हिडिओ
@AMAZlNGNATURE नावाच्या पेजवर पोस्ट केला आहे. अजगर मुंग्यांच्या प्रदेशात घुसतो आणि …..! निसर्ग आपल्याला सांगतो;कोणत्याही सजीव प्राण्याला कधीही कमी लेखू नका, समुदाय हा एकापेक्षा बलवान असतो.
हा व्हिडीओ एकीचे बळ देखील दर्शवत आहे. संकट कितीही मोठे असले तरी सर्वांनी मिळून सामना केला तर त्यावर सहज मात करता येते.