Stunt video viral: आजकाल लोक सोशल मीडियावर जास्त वेळ घालवताना दिसतात. लोक फोटो, व्हिडीओ बनवत ते इंटरनेटवर शेअर करतात. त्यामुळे दिवसेंदिवस सोशल मीडियाचं क्रेझ वाढत आहे. लोक प्रसिद्धीसाठी काहीही करताना दिसतात. आपला जीवही धोक्यात घालायला कमी करत नाही. यामध्ये लहानापांसून मोठ्यांपर्यंत सर्वच सोशल मीडियाच्या आहारी गेले आहेत. असाच एक व्हिडीओ समोर आलाय ज्यामध्ये एका तरुणी रील बनवण्यासाठी चक्क उंच इमारतीवरुन खाली लटकत आहे. हे इतकं भयानक आहे की बघूनत अंगावर काटा येतो. वर उभ्या असलेल्या व्यक्तीच्या हातातून तरुणीचा हात चुकन जरी निसटला तर तरुणीचा थेट मृत्यू होऊ शकतो. जगात लोक प्रसिद्धीसाठी काहीही करु शकतात.अगदी मृत्यूच्या दारातही जाऊ शकता हे या व्हिडीओतून पाहायला मिळत आहे.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुणी उंच बिल्डिंगवरुन स्टंटबाजी करताना दिसून आली. तिनं अक्षरशः तिच्या मित्राच्या हाताच्या सहाय्यानं भल्यामोठ्या बिल्डिंगच्या खिडकीतून लटकली. हे दृश्य पाहूनच अंगावर काटा येतोय. या दोघांचा कुणीतरी तिसरा व्यक्ती व्हिडीओ काढत आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, ती तरुणी खूप घाबरलेली आहे. तिच्या चेहऱ्यावर ते भाव दिसत आहेत मात्र, तरीही ती स्टंट करतेच. सुदैवानं ती सुखरुप वर येते. मात्र यामध्ये जीवही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Non Veg Panipuri: काय सांगता! चिकन पाणीपुरी? Video पाहून नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप

दरम्यान, लोक सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी काहीही करतात. यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आल्या आहेत ज्यामध्ये लोकांनी फोटो, व्हिडीओसाठी धोकादायक ठिकाणं निवडली. अनेकांसोबत हे करत असताना दुखापतही झालेली समोर आली.

सोशल मीडियावर विविध व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे, ज्यावर एखादी व्यक्ती काही दिवसात इतकी लोकप्रिय होऊ शकते की तो सेलिब्रिटी बनतो. तुम्ही अनेकांना रातोरात फेमस बनताना पाहिले असेल. जरी काही लोक यासाठी अशा गोष्टी करतात, ज्याचा कोणी विचारही केला नसेल.