Social Media Influence Murder : सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारखे प्लॅटफॉर्म्स कमाईचेदेखील माध्यम झाले आहेत. सोशल मीडियावर इन्फ्लुएन्‍सरची क्रेझही हल्ली मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यातच सोशल मीडियावर या इन्फ्लुएन्‍सरमध्ये स्पर्धाही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातून काही चांगल्या गोष्टीही घडतात; तर काही वाईटही. अशीच एक धक्कादायक दुर्घटना सध्या समोर आली आहे. त्यामध्ये एका प्रसिद्ध इनफ्लुएन्‍सरला भररस्त्यात गोळ्या घातल्या आहेत. या थरारक दुर्घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

हल्ली कुणालाच कायद्याचा धाक राहिलेला नाही. प्रसिद्ध टिकटॉक स्टार ओम फहादची तिच्या घराबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. ओम फहाद आपल्या घराबाहेर कारमध्ये असताना बाईकवरून आलेल्या हल्लेखोरानं तिच्यावर गोळ्या झाडल्या. या गोळीबारात ओम फहादचा जागेवरच मृत्यू झाला. हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. ओम फहाद ही इराकची प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होती. इराकच्या बगदादमधील जियोन जिल्ह्यत रविवारी रात्री उशिरा ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेची माहिती अल-जजीरानं दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गृह मंत्रालयानं हत्येच्या परिस्थितीचा तपास करण्यासाठी एक पथक स्थापन केले आहे.

Puneri Pati
“उगाच पुण्याच्या पाट्या जगभर प्रसिद्ध नाहीत!” नो पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेरी शैलीत टोला, पाहा पुणेरी पाटी
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
police filed Chargesheet against actor Raj Tarun
गर्भपात करायला भाग पाडलं, फसवणूक केली; एक्स गर्लफ्रेंडने पुरावे दिल्यावर प्रसिद्ध अभिनेत्याविरोधात आरोपपत्र दाखल
problem of koyta attacks and traffic congestion on the roads in Pune is serious
पेन्शनरांच्या पुण्याचे हे असे काय झाले?
ladki sunbai yojana | pune Baramati banner goes viral
लाडकी सुनबाई योजना! सासुबाईच्या जेवणावर सुनबाईचे जेवण फ्री, बारामतीचे बॅनर चर्चेत, Photo एकदा पाहाच
Virat Kohli Emotional Reaction on Shikhar Dhawan Retirement Shares Post
Virat Kohli Shikhar Dhawan: “तुझी ट्रेडमार्क स्माईल अन् असंख्य आठवणी…” शिखर धवनच्या निवृत्तीवर विराट कोहलीची भावुक पोस्ट, पाहा काय म्हणाला?
Foreign influencer dance trending news in marathi
‘कहते है हमको इंडिया वाले…’ गाण्यावर परदेशातील इन्फ्लुएन्सरने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांनी केलं कौतुक
Killy Paul did a stunning dance on the song Arabi Kuthu
पारंपरिक वेश सोडून ‘अरबी कुथू’ गाण्यावर किली पॉलने केला जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरी करतायत कौतुक

पाहा थरारक व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: जिममध्येच मृत्यूनं गाठलं; वर्कआउटवेळी अचानक कोसळला अन् ५ सेकंदात गेला जीव, तुम्ही ‘ही’ चूक करत नाही ना?

कोण आहे ओम फहाद?

गोळ्या झाडण्यात आलेल्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्‍सरचं खरं नाव गुफरान सावादी, असं आहे. टिकटॉकवर तिचे जवळपास पाच मिलियन एवढे फॉलोअर्स आहेत. फेब्रुवारी २०२३ मध्ये एका व्हिडीओत तिनं आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप तिच्यावर ठेवण्यात आला होता. त्यावेळी बगदाद न्यायालयानं तिला सहा महिन्यांची शिक्षा सुनावली होती.

अल-जजीराच्या रिपोर्टनुसार ओम फहादनं एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म बनविला होता. त्यावर ती युजर्सना भडकवत असल्याचाही आरोप तिच्यावर करण्यात आला होता. इराणच्या मंत्रालयानं कठोर पावलं उचलल्यानंतर काही ऑनलाइन कंटेट क्रिएटरनी माफी मागत काही कंटेट हटवले होते.