Influencer dating a tree: सोशल मीडियावर दर दुसऱ्या दिवशी अनोखे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातले काही व्हिडीओ आपल्याला थक्कच करणारे असतात, जे आपल्या कायमचे लक्षात राहतात. असे व्हिडीओ या डिजिटल युगात व्हायरल व्हायला जास्त वेळ लागत नाही. काही लोक काही लाइक्स आणि कमेंट्ससाठी खूप विचित्र प्रकार करतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून तुमचं डोकं नक्कीच चक्रावून जाईल. या व्हिडीओत एक सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर चक्क झाडाला डेट करताना दिसतेय. हे कसं शक्य आहे ते पाहू या.

भारतात कुंडली किंवा अन्य कारणामुळे एखाद्या व्यक्तीचं झाडाशी लग्न लावलं जातं हे तुम्ही ऐकलं असेल; पण कधी कोणी झाडालाच डेट करतंय, असं ऐकलंय का? सोशल मीडिया कटेन्ट क्रिएटर व इन्फ्लूएन्सर असलेली आयव्ही ब्लूम ही चक्क एका झाडाला डेट करीत आहे. तिने तिचा याबाबतचा अनुभव नुकताच ऑनलाइन शेअर केला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा… आयुष्यापेक्षा झोप महत्त्वाची! गाढ झोपले होते अन् घोरपड घरात घुसली, पुढे जे झालं ते पाहून काळजाचा ठोका चुकेल, पाहा VIDEO

इन्फ्लूएंसर करतेय झाडाला डेट

सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आयव्ही ब्लूमने (Ivy Bloom) तिच्या यूट्यूब चॅनेलवर काही व्हिडीओ शेअर केले, ज्यात तिने झाडासोबत डेट केल्याचा खुलासा केला आहे. ती म्हणाली की, ते दोघं गेल्या दोन आठवड्यांपासून एकमेकांना डेट करीत आहेत. एका व्हिडीओमध्ये आयव्ही तिच्या घरात झाडाचं स्वागत करताना आणि त्या झाडाला प्रेमानं आणि आपुलकीनं मिठी मारताना दिसते आहे. व्हिडीओमध्ये ही इन्फ्लूएन्सर एका माणसाबरोबर नाही, तर चक्क झाडाबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याचं दाखवलं आहे. ती झाडाला मिठी मारताना, किस करताना व फिरायला जाताना, तसंच वॉटर स्पोर्ट्स करताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

इंटरनेटवर तिच्या जोडीदाराची ओळख करून देताना तिनं, यूट्यूब व्हिडीओमध्ये सांगितलं की, तिनं झाडामध्ये AI सिस्टीम जोडली आहे. या AI मुळे झाडांची पानं हलतात आणि त्यामुळे झाड बोलतं. यातून आमचे संवाद होतात. या व्हिडीओमधील आयव्हीचं हे झाडाशी डेटिंग करणं आणि त्यासंबंधीचं तिचं कथन अनेकांना विचित्र वाटू शकतं. आयव्हीचा हा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल झाला असून, अनेकांनी त्यावर आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा… बैलाने मारली उडी अन् स्कूटर चालक गेला ट्रकच्या खाली, पुढे नेमकं काय घडलं? पाहा धक्कादायक VIDEO

आयव्हीचा यूट्यूब व्हिडीओ पाहून एका युजरनं कमेंट करीत लिहिलं, “हा विनोद आहे हे ऐकून बरं वाटलं. जर हे खरं असतं, तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली असती.” दुसऱ्यानं, “किती सुंदर कपल आहे हे. मी पैज लावू शकतो की, तुम्ही जगातील सर्वांत बेस्ट कपल असाल,” अशी कमेंट केली.

Story img Loader