scorecardresearch

Premium

Video: तरुणीच्या रिल्सची हौस पोलिसांना पडली भारी; पोलिस अधिकाऱ्यावर झाली निलंबनाची कारवाई

एका पोलिस अधिकाऱ्याने त्याच्या ड्युटीवर असताना पोलिसांचे अधिकृत वाहन एका तरुणीला रिल्स बनवण्यासाठी वापरण्यास परवानगी दिली होती.

punjab cop suspended after influencer uses police vehicle for insta reel
Video: तरुणीच्या रिल्सची हौस पोलिसांना पडली भारी; पोलीस अधिकारी झाले निलंबित (photo – @SharmaMriudul_ twitter)

Punjab Police Video:  तरुण मंडळी रिल्स बनवण्यासाठी कधी काय करतील सांगता येत नाही. परंतु त्यांची ही रिल्सची हौस अनेकदा इतरांना भारी पडते. असाच काहीसा प्रकार पंजाबमध्ये घडला आहे. जिथे एका पोलीस अधिकाऱ्याने ड्युटीवर असताना पोलिसांचे अधिकृत वाहन रिल्ससाठी तरुणीला वापरण्याची परवानगी दिली, ज्यामुळे पोलिस अधिकाऱ्याला कामावरून निलंबित करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या तरुणीचा पोलिसांच्या वाहनाबरोबर रिल्स बनवल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवर आता नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

पोलिसांच्या वाहनावर बसून काढली रिल्स

एका सोशल मीडिया इन्फ्युएंसरला रिल्स बनवण्यासाठी अधिकृत पोलिस वाहन वापरण्याची परवानगी दिल्याबद्दल जालंदरचे पोलिस आयुक्त कुलदीप चहल (IPS) यांनी निरीक्षक/एसएचओ अशोक शर्मा यांना निलंबित केले आहे. पंजाब पोलिसांचे अधिकृत वाहन म्हणून ओळखल्या जाणार्‍या महिंद्रा स्कॉर्पिओच्या बोनेटवर बसून ही तरुणी बसलेली दिसत आहे. ती वाहनाच्या बोनेटवर बसून पंजाबी गाण्यावर पोज देताना दिसली आणि नंतर कॅमेऱ्याकडे बसून हातांनी अश्लील हावभाव केले. यावेळी पंजाब पोलिसांचा एक शिपाई हा सर्व प्रकार सुरु असताना तिथे उपस्थित होता.

nigerian citizen escaped from police custody, navi mumbai police raid, nigerian citizen arrested for drugs smuggling in navi mumbai
Video : नवी मुंबई पोलिसांची बेफिकरी आणि चपळता, दोन्हींचे उदाहरण एकाच वेळी….बघा नक्की काय घडलं
israel war hamas terrorist
“ना मोहीम, ना गोळीबार…हे युद्ध आहे”, हमासच्या हल्ल्यानंतर नेतान्याहूंनी ठणकावलं; म्हणाले, “त्यांनी कल्पनाही केली नसेल अशी…!”
ias- rinku-dagga-compulsory-retired
पाळीव कुत्र्याला फेरफटका मारण्यासाठी आख्खं स्टेडियम रिकामं करायला लावणं भोवलं; महिला IAS अधिकाऱ्याला निवृत्तीचे आदेश!
mumbai traffic police, traffic police hit with helmet, driving licence traffic police, mumbai man hit traffic police
मुंबई : वाहतुक पोलिसाच्या डोक्यात मारले हेल्मेट, आरोपीला अटक

पंजाब पोलिसांनी एसएचओवर नेमकी काय कारवाई केली याबद्दल फारशी माहिती समोर आलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी एसएचओला काही दिवस किंवा आठवड्यांसाठी निलंबित केले आहे. मात्र, या सोशल मीडिया इन्फ्युएंसर तरुणीवर कोणतीही कारवाई झालेली नाही. कारण या तरुणीने पोलीस अधिकाऱ्यांच्या परवानगीनेच हा व्हिडिओ बनवला होता. त्यामुळे तिच्यावर पोलीस कारवाई करणे अन्यायकारक ठरु शकत होते. तरीही सार्वजनिक ठिकाणी असभ्य कृत्ये करणे किंवा पोलिसांच्या वाहनसह सार्वजनिक मालमत्तेचा वापर करणे भारतात बेकायदेशीर आहे. त्यामुळे ही पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Social media influencers girl makes reel while sitting on a police car commissioner suspended the sho sjr

First published on: 30-09-2023 at 10:03 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×