केंद्र सरकारच्या ‘माय गव्हर्नमेंट इंडिया’ या ट्विटर हँडलवर प्रजासत्ताक दिनी सादर होणाऱ्या परेडच्या सरावाचा एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. यानंतर या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. कुणी या नव्या गाण्याला आणि या सरावाला पसंती देत आहे, तर कुणी ‘मोनिका ओ माय डार्लिंग’ हे गाणं आणि त्यावरील सैन्याचा सराव चुकीचा असल्याचं म्हणत आहेत. काही सोशल मीडिया युजर्सने तर हे नेटफ्लिक्सचं अकाऊंट आहे की भारत सरकारचं असा सवालही केलाय.

‘माय गव्हर्नमेंट इंडिया’ या ट्विटर हँडलवर हा व्हिडीओ पोस्ट करताना म्हटलं आहे, “काय नजारा आहे! हा व्हिडीओ पाहून तुमच्या अंगावर नक्की शहारे येतील. तुम्ही ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचे साक्षीदार होण्यासाठी तयार आहात का? आत्ताच या समारंभाच्या ई-तिकिटसाठी बुकिंग करा.” या ट्वीटमध्ये संरक्षण मंत्रालय आणि अमृत महोत्सवाच्या ट्विटर हँडललाही टॅग करण्यात आलंय.

job opportunity in indian coast guard
नोकरीची संधी : इंडियन कोस्ट गार्डमधील संधी
Semiconductor project
सेमीकंडक्टर चिपच्या १.२६ लाख कोटींच्या ३ प्रकल्पांना मोदी सरकारची मंजुरी; ३ पैकी २ प्रकल्प गुजरातमध्ये
Nitisha Kaul sent back to uk
युकेतून भारतात आलेल्या काश्मिरी पंडित प्राध्यापिकेला इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी परत पाठवलं मायदेशी; नेमकं प्रकरण काय?
loksatta analysis adani group wins bid to redevelop bandra reclamation
विश्लेषण : मुंबईच्या पुनर्विकासावर अदानींचा वरचष्मा? धारावीपाठोपाठ वांद्रे रेक्लमेशनही?

‘मोनिक ओ माय डार्लिंग’च्या संगितावर सराव करताना दाखवणारा हा व्हिडीओ पोस्ट झाल्यानंतर त्याखाली अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यात काही जण या नव्या गाण्याचं आणि सरावाचं कौतुक करत आहेत, मात्र, अनेकजण यावर आपली नाराजी देखील व्यक्त करत आहेत. एका युजरने तर हे नेटफ्लिक्सचं हँडल आहे? की माझ्या देशाच्या सरकारचं? असा सवाल केलाय. तसेच कमीत कमी देशाचं सैन्य, स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्यसैनिक यांना तरी यापासून दूर ठेवा, असं मत व्यक्त केलंय.

अन्य एका युजरने हा विचार लज्जास्पद असल्याचं म्हणत हे भारतीय सैन्य आहे का? असा सवाल करत माझा यावर विश्वास बसत नसल्याचं म्हटलं.

एका युजरने म्हटलं, “प्रजासत्ताक दिनी ‘पिया तू अप तो आजा’ या धूनवर आपल्या सैनिकांनी परेड करावी असं खरंच वाटतं का? अंगावर शहारे येणं विसरून जा, हा या समारंभाचा आणि सैनिकांचा अपमान आहे.”

“हे काय आहे. तुम्ही जगात भारतीय सैन्याबद्दल असलेल्या आदराला आणि प्रतिमेला धक्का लावत आहात. जेव्हा प्रजासत्ताक परेडचा विचार करतो तेव्हा शिस्त, धाडस आठवतं, ‘नौटंकी’ नाही. गणवेश म्हणजे सन्मान,” असं म्हणत एका युजरने भारतीय सैन्याच्या ट्विटर हँडलला टॅग केलं.

एका युजरने तर म्हटलं, “बरं झालं मोनिक ओह माय डार्लिंग गाण्याची केवळ धून वापरली, मोनिकाचा डान्स नाही घेतला. बाकी हे गाणं कुणाची पसंत आहे? मोदींची का?”

अन्य एका युजरने तर या गाण्याचा व्हिडीओ पोस्ट करत हे गाणं ऐकून सरकारने दिलेले जुमले आठवत असल्याचं म्हटलं.

दुसरीकडे काही युजर्सने हा व्हिडीओ मजेशीर असल्याचं म्हणत या व्हिडीओला पसंती दिलीय.

एकूणच प्रजासत्ताक दिनाच्या परेडच्या गाण्याचा हा निर्णय वादग्रस्त ठरला आहे.

हेही वाचा : संचलनात ‘मोनिका ओ माय डार्लिग’ गाण्याची धून वाजवण्याचा निर्णय दुर्दैवी

दरम्यान, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ‘अबाईड विथ मी’ या आवडत्या प्रार्थनेचे सूर बिटिंग रिट्रीट कार्यक्रमातून काढून टाकणे, प्रजासत्ताक दिनाच्या परेडसाठी मोनिका.. ओ माय डार्लिग या गाण्याची धून वाजवण्याचा मोदी सरकारच्या निर्णय दुर्दैवी आहे. महागाई, बेरोजगारी वाढवून लोकांचे जीवन असह्य केल्यानंतर देशाच्या प्रथा, पंरपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न सरकारद्वारे होत आहे. याबाबत जनता सरकारला नक्कीच जाब विचारणार आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहन जोशी यांनी केली.