Learn how this Software Engineer secured a 1.8 crore salary package using a specific job strategy and disciplined execution : शिक्षण पूर्ण केल्यानंतर एक चांगल्या पगाराची नोकरी मिळवणं हे अनेकांचे ध्येय असते. अशाच एका एका भारतीय सॉफ्टवेअर इंजिनिअरने भारतात राहूनच १.८ कोटी रुपये पगाराची परदेशातील नोकरी मिळवून दाखवली आहे. त्याने ही नोकरी कशी मिळवली हे उघड केल्यानंतर त्याची सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा होत आहे. परदेशात कामाचा अनुभव किंवा नेटवर्किंग हे जागतिक स्तरावरील नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक असते या समजुतीला त्याने एक प्रकारे छेद दिला आहे.

कार्तिक मोदी असे या तरूणाचे नाव असून तो अॅमेझॉनमध्ये SDE 2 म्हणून काम करतो आणि त्याने यापूर्वी मायक्रोसॉफ्ट आणि उबर यासारख्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. कार्तिकने त्याच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये त्याचा हा प्रवास कसा होता याबद्दल माहिती दिली आहे. तसे त्याने त्याची स्ट्रॅटेजी देखील सांगितली आहे. “नो रिलोकेशन, नो नेटवर्क अब्रॉड. जस्ट एक्झिक्युशन फ्रॉम माय रूम! (कोणतेही रिलोकेशन नाही. परदेशात कसलेच नेटवर्किंग नाही. फक्त माझ्या खोलीतून केलेली कोणतेही नेटवर्किंग नाही; फक्त माझ्या खोलीतून केलेली प्रत्यक्ष कृती!)” असे त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे.

कार्तिक मोदीने दिलेल्या माहितीनुसार, पहिली पायरी योग्य संधी ओळखणे ही होती. त्याने सुमारे २५ ते ३० आंतरराष्ट्रीय कंपन्यांची निवडल्या आणि त्यामधून लिंक्डइन, इनडीड आणि Levels.fyi अशा प्लॅटफॉर्म्सच्या मदतीने अशा नोकऱ्या वेगळ्या केल्या ज्यामध्ये व्हिसा स्पॉन्सरशिप दिली जात होती.

त्यानंतर त्याने कंपन्यांकडून कोणत्या कौशल्यांची मागणी केली जाते हे समजून घेण्यासाठी ३५–४० जॉब डिस्क्रिप्शन्सचा अभ्यास केला. ६० टक्क्यांहून अधिक नोकऱ्यांच्या जाहिरातींमध्ये दिसून येणारे जे काही असेल त्याचा त्याने आपल्या ‘प्रीपरेशन प्लॅन’मध्ये समावेश केला.

वाटेल त्याची तयारी करण्यापेक्षा कार्तिकने सुनियोजित १०-१२ आठवड्यांच्या एका शिस्तबद्ध वेळापत्रकाचे पालन केले. त्याने पहिले पाच आठवडे डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदम यावर लक्ष केंद्रीत केले. त्यानंतर सिस्टम डिझाइन, डोमेन एक्सपर्टीज आणि बिहेवियरल इंटरव्ह्यू यांची तयारी केली. जास्त तयारी करण्यापेक्षा त्याने सखोल अभ्यासाला महत्त्व दिले. त्याने जवळपास १०० प्रॉब्लेम्स सोडवले, पण असे करताना त्याने त्यामध्ये पॅटर्न आणि स्पष्टतेवर भर दिला.

कार्तिक मोदीच्या मते, त्यांच्या या यशात सिस्टम डिझाइनची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरली. त्याने ऑथेंटिकेशन, पेमेंट्स, सर्च आणि नोटिफिकेशन्स यांसारख्या ८ ते १० कोअर सिस्टम्सवर काम केले. यामध्ये त्यांनी APIs, डेटाबेस, कॅशिंग आणि फेल्युअर सिनॅरिओ यासारख्या तांत्रिक बाबींवर विशेष भर दिला.

कार्तिकने त्याचे महत्त्वाचे प्रोजेक्टच्या नोंदी ठेवून तसेच स्केल, लेटन्सी, डिसीजन मेकिंग यावर लक्ष केंद्रीत करत त्यांच्या व्यवसायिक अनुभवाचाही फायदा घेतला. इंटरनॅशनल हायरिंग स्टँडर्डशी जुळवून घेण्यासाठी त्याने त्यांनी फक्त एका पानाचा रिझ्युमे (Resume) तयार केला.

कार्तिकच्या तयारीचा आणखी एक अत्यंत महत्त्वाचा भाग म्हणजे ‘मॉक इंटरव्ह्यू’. त्याने ६ ते ८ मॉक इंटरव्ह्यू दिल्याने त्याला आपल्यातील त्रुटी लक्षात आल्या आणि स्वतःच्या कामगिरीत सुधारणा करता आली. प्रत्यक्ष मुलाखतींदरम्यान त्याने ‘स्ट्रक्चर्ड थिंकिंग’ आणि स्पष्ट संवादावर भर दिला.

त्याच्या या शिस्तबद्ध प्रयत्नांमुळे अखेर त्याला एक चांगल्या पगाराची परदेशातील नोकरी मिळाली. त्याने स्पष्ट केले की, यासाठी कसलीही हॅक किंवा कोणताही शॉर्टकट नाह. सातत्य राखून एका विशिष्ट पद्धतीने काम करत राहिल्यास असे यश मिळू शकते असे त्याने सांगितले. परदेशात स्थलांतर करणे किंवा तिथल्या कनेक्शन्सवर अवलंबून राहण्यापेक्षा, तयारी आणि सातत्य याला प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्याने अशा नोकरीच्या शोधात असलेल्यांना केले.