Viral Video : सीमेवर सैनिक असतात बिनधास्तपण जगू शकतो आणि स्वातंत्र्य अनुभवू शकतो. हे सैनिक देशाचे रक्षण करण्यासाठी स्वत:च्या कुटुंबापासून व आपल्या लोकांपासून दूर राहतात. सर्वात मोठा त्याग करतात. त्या सैनिकांचे आभार मानावे तितके कमी आहे. सोशल मीडियावर सैनिकांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ भावूक करणारे असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल आहे. या व्हिडीओमध्ये एक सैनिक तब्बल पाच वर्षानंतर घरी जातो आणि मुलाला अचानक समोर पाहून आईचा आनंद गगनात मावेनासा होतो. (Soldier came in front of his mother after five years)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक भारतीय सैनिक दिसेल. तो घरी येतो आणि आईला सरप्राइज देतो. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की सैनिक गुपचूप स्वयंपाकघरात जातो आणि मागून आईचे डोळे झाकतो. आईला वाटते की कोण तिची गम्मत करत आहे पण जेव्हा सैनिक मुलगा तिच्या डोळ्यावरून हात काढतो तेव्हा ती बघतच राहते. तिला विश्वास बसत नाही आणि क्षणात ती मुलाला मिठी मारते. तिच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा असतो. या आईला भावूक होताना पाहून तुम्हालाही अश्रु आवरणार नाही. या मायलेकाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

हेही वाचा : पाण्यात अडकलेल्या श्वानाला वाचवण्यासाठी तारेवरची कसरत; एकमेकांचा धरला हात अन्… VIDEO तून पाहा मानवी साखळीचे बळ

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : “लेक परक्याचे धन, बाबा तुटतो आतून..” सासरी जाणाऱ्या मुलीला मिठी मारत वडील ढसा ढसा रडले, VIDEO पाहून तुम्हालाही येईल रडू

marathi_vibe_08 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पाच वर्षानंतर आई समोर आल्यावर..” एका युजरने लिहिलेय, “आई ही जीवन भर आपल्या मुला वर निस्वार्थ प्रेम करते” तर एका युजरने लिहिलेय, “आई च्या नजरेत एक तास पण नसलो तर आई किती तोंड एवढूस करते आणी ह्या आई च तर लेकरू ५ वर्ष नव्हते तर काय हाल झाले असतील. त्या मुलालाच महिती काय फिल होत् असेल ते …” आणखी एका युजरने लिहिलेय, “आई ती आई असते भावा निस्वार्थ प्रेम इथंच भेटतं फक्त” एक युजर लिहितो, “डोळ्यात आनंदाने पाणी येणारा एक क्षण”