Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. काही लोक डान्स करताना दिसतात तर काही लोक गाणी गाताना दिसतात. अनेक जण आपली कला सादर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये दोन तरुण कला सादर करताना दिसत आहे. एक तबला वाजवताना दिसत आहे तर एक गाणं म्हणताना दिसत आहे. आजवर सोशल मीडियावर तुम्ही अनेक व्हिडीओ पाहिले असेल पण असा व्हिडीओ कदाचित पहिल्यांदा पाहाल. या तरुणांनी चक्क कुत्र्यासाठी गाणं तयार केले आहे. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

तरुणांनी बनवले कुत्र्यांसाठी गाणं!

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दोन तरुण दिसतील. एक तरुण तबला वाजवताना दिसत आहे तर दुसरा गाणं म्हणताना दिसत आहे. या तरुणाचं गाणं ऐकाल तर तुम्ही सुद्धा डोक्याला हात लावाल. तो तरुण चक्क कुत्र्याच्या आवाजात गाणं गाताना दिसत आहे. विशेष म्हणजे त्याच्या गाण्याच्या लयीवर दुसरा तरुण तबला वाजवताना दिसत आहे. हे अनोखं गाणं ऐकून कोणीही थक्क होईल. ज्या लोकांना कुत्रा खूप आवडतो, त्यांना हे गाणं सुद्धा खूप आवडेल. भारतात क्रिएटिव्हीची कमतरता नाही, त्यात या गाण्याने सर्वांना अवा्क केले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

jacpur या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कुत्र्यांसाठी गाणं” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “इतकं टॅलेंट कुठून येतं भावा” तर एका युजरने लिहिलेय, “एक कलाकार तर दुसरा महान कलाकार” आणखी एका युजरने लिहिलेय, “भावांना जेव्हा कुत्रा हे गाणं ऐकणार तर मजा येईल” एक युजर लिहितो, “हे गाणं भारताच्या बाहेर जायला नको” तर एक युजर लिहितो, “हे देवा, कुठून येतात हे लोक” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत. काही युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. अनेक लोकांना हे गाणं खूप आवडलं आहे.