प्राण्यांशी छेडछाड करणे म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. पण जर आपण प्राणिसंग्रहालयात प्राणी बघायला गेलो आणि तिथे आपण त्यांच्या रागाचे बळी ठरलो तर? असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून हा व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हाला देखील धक्का बसेल.

इंस्टाग्रामवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये, पिंजऱ्यात बंद चिंपांझी बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीवर अचानक हल्ला करत असल्याचे दिसून येते. चिंपांझी खूप रागावलेला दिसतो. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेला हा व्हिडीओ वाऱ्याच्या वेगाने पसरत आहे.

चिंपांझीच्या तावडीत अडकलेला माणूस स्वत:ला सोडवण्यासाठी लाखो प्रयत्न करतो. दुसरा माणूस सुद्धा त्या व्यक्तीला मदत करण्याचा प्रयत्न करतो, मग चिंपांझी चिडून त्यालाही धरतो. व्हिडीओच्या शेवटी, चिंपांझीने त्या माणसाचा पाय पकडला होता. तथापि, नंतर या माणसाची चिंपांझींच्या तावडीतून सुटका करण्यात यश मिळते.

गाडीत बसलेल्या प्रवाशांना उतरवायची अनोखी पध्दत पाहिली का? पाहा Viral Video

फ्लश करताना टॉयलेट सीटचे झाकण बंद ठेवावे की उघडे? संशोधनातून समोर आली माहिती

अनेक लोक या व्हिडीओची खिल्ली उडवत आहेत आणि म्हणत आहेत की कदाचित चिंपांझीला मिठी मारायची आहे. या व्हिडीओतील व्यक्तीची अवस्था पाहून अनेकांना धक्काही बसला आहे. अवघ्या तीन तासांत या व्हिडीओला ७,३०० हून अधिक लाइक्स मिळाले आहेत.