scorecardresearch

प्रेयसीनं ब्रेकअप केल्यानंतर तिला मनवण्यासाठी मुलानं केलं असं काही… Viral Video पाहून आवरणार नाही हसू

एक मुलगा आपल्या मैत्रिणीला मनवण्यासाठी काय करतोय ते एकदा पाहाच.

viral video
एक मुलगा आपल्या मैत्रिणीला मनवण्यासाठी काय करतोय ते एकदा पाहाच. (Instagram)

प्रत्येकासाठीच त्याच्या आयुष्यातील पहिलं प्रेम खूपच खास असतं. ते गमवावं असं कोणालाच वाटत नाही, मात्र आपलं पहिलं प्रेम आयुष्यभर आपल्याबरोबर राहील याची खात्री देता येत नाही. या प्रेमामुळे आपण जीवनातील अनेक धडे शिकतो. कोणासाठीही पहिलं ब्रेकअप हे फारच दुःखद असतं. बऱ्याचजणांना त्यांच्या शाळेच्या दिवसांमध्ये हा अनुभव येतो. अशाच एका प्रसंगी एक मुलगा आपल्या मैत्रिणीला मनवण्यासाठी काय करतोय ते एकदा पाहाच.

फनटाप या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की एक शाळेतील मुलगी तिच्या मित्राबरोबर ब्रेकअप करते. ती फुटपाथजवळील एका बंद दुकानाशेजारी उभी आहे. तिचा मित्र तिचे पाय पकडून तिला असे न करण्यासाठी विनवणी करत आहे. व्हिडीओमध्ये ‘बेबी मान जाओ ना’ असे लिहले आहे. हा मुलगा या मुलीकडे अक्षरशः प्रेमाची भीक मागत आहे.

Video : मुलगा सायकल चालवत असताना अचानक कुत्र्याचा हल्ला, धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद

या व्हिडीओला आतापर्यंत ७५ हजारांहूनही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. मुलगा मुलीच्या पायाला हात लावताना आणि तिला समजवण्याचा प्रयत्न करताना दिसतो पण ती नकारार्थी मान हलवते. नेटकरी मात्र हा व्हिडीओ पाहून त्या मुलाची खिल्ली उडवत आहेत. वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून तो वेगाने व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 13-09-2022 at 13:28 IST