आई-मुलाचं असं नातं असतं ज्यात मुलगा त्याच्या सगळ्या गोष्टी अगदी मनमोकळेपणाने आईकडे शेअर करतो. जेव्हा मुलाला गरज असते त्यावेळी आई सगळ्या संकटांना पार करत मुलाच्या मदतीला धावून येते. आई होण्यापासून ते मुलांना मोठं करण्यापर्यंतचे आयुष्यातले सर्व चॅलेंज ती निर्भीडपणे पार करत असते. पण त्याच आईला जर तुम्ही चॅलेंज केलं तर काय होतं? हे सांगणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमधील आईचं हे टॅलेंट पाहून तुम्हीही आश्चर्य व्हाल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आईसमोर स्टाईल दाखवणं पडलं भारी

आईने जर एकदा का एखादी गोष्टी ठरवली की मग ती आकाश पाताळ एक करेल. पण ती गोष्टी पूर्ण करून दाखवणारंच, हे मुलांना चांगलंच माहित असतं. असाच काहीसा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये मुलगा आपल्या आईला एक चॅलेंज देतो. इतकंच नाही तर ते चॅलेंज पूर्ण केलं तर २००० रूपये देण्याची बोली सुद्धा करतो. आपली आई हे चॅलेंज पूर्ण करणारंच नाही, असा ठाम विश्वास त्या मुलाला होता. पण त्यानंतर आईने जे काही केलं ते पाहून फक्त मुलगाच नव्हे तर तुम्ही सुद्धा थक्क व्हाल.

बॉटल चॅलेंजचं भूत दोन मिनिटांत उतरवलं

होय, व्हिडीओमध्ये एक मुलगा आपल्या आईला बॉटल चॅलेंज देतो. यात बॉटल हवेत उडवत पुन्हा ती सरळच उभी राहिल अशी फिरवायची असते. आई अगदी बिनधास्तपणे बॉटल आपल्या हातात घेते आणि मोठ्या आत्मविश्वासाने ती मुलाला लूक सुद्धा देते. हे चॅलेंज आपल्या आईला जमणारच नाही असा विचार मुलगा करतो न करतो तितक्यात आईने बॉटल हवेत फिरवत खाली न पाडता ती जशीच्या तशी उभी करून दाखवली. हे पाहून मुलगा हैराण झाला. या चॅलेंजसाठी मुलाने दोन हजार रूपयांची शर्थ लावली होती. आधी म्हटल्याप्रमाणे मुलाने दोन हजार रूपयांची नोट काढून तो आईला देतो.

आईसमोर स्टाईल दाखवणाऱ्या मुलाच्या डोक्यावरचं चॅलेंजचं भूत अगदी दोन मिनिटांत उतरवलं. मुलाला हरवल्याच्या आनंदात आई सुद्धा त्याला दोन हजाराची नोट दाखवून चिडवते.

‘व्हिडीओ नेशन’ नावाच्या फेसबूक अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमधल्या आईचा स्टायलिश अंदाज नेटकऱ्यांच्या पसंतीस पडताना दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून ६२ हजारापेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Son give flip bottle challenge to his mother in just 2 seconds he took off his ghost prp
First published on: 28-09-2021 at 17:44 IST