आई आणि मुलाचं नात खास असतं, मुलाचं एकवेळ बाबांसोबत पटणार नाही मात्र आईसोबत त्यांचं बाँडिंग खास असतं. जशा मुली बाबांच्या लाडक्या तशी मुलं आईची लाडकी असतात. दरम्यान मुलगा कितीही लाडका असला तरीही एका वेळेनंतर त्याच्यावर घरची जबाबदारी येतेच. यासाठी अनेकवेळा मुलांना शिक्षणासाठी, नोकरी धंद्यासाठी बाहेर गावी घर सोडून जावं लागतं. अशाच एका बाहेरगावी राहणाऱ्या मुलानं चक्क तीन वर्षांनंतर त्याच्या आईला भन्नाट सरप्राईज दिलं आहे. याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायल झाला आहे.

आईला दिलं सरप्राईज

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक महिला रस्त्याच्या कडेला मासे विकत आहेत. यावेळी तोंंडाला मास्क लावलेला एक तरुण त्या महिलेजवळ जातो आणि माशांची किंमत विचारतो, खरतर हा तरुण म्हणजे त्या महिलेचा मुलगा. मात्र मास्क लावल्यामुळे तिला त्याला ओळखता येत नाही. बराच वेळ भाव केल्यानंतर महिलेला संशय येतो, शेवटी कितीही झालं तरी आईच ती..लक्षात येताच महिला तरुणाला खालून वरुन नीट पाहू लागते आणि तिच्या पटकन लक्षात येतं की हा आपलाच मुलगा आहे, ती आश्चर्यचकीत होते आणि त्याला घट्ट मिठी मारते.

तीन वर्षांपासून न दिसलेला मुलगा अचानक समोर येतो, हे सगळं पाहून तिला विश्वासच बसत नाही. यावेळी दोघांच्याही डोळ्यात आनंदअश्रू दिसत आहेत. हा तरुण गेल्या तीन वर्षांपासून दुबईला राहतो, मात्र अचानक काहीही कल्पना न देता हा थेट आईला भेटायला आला.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: संतापजनक! “तू इथे का आलास” म्हणत तरुणाची वृद्धाला अत्यंत निर्दयीपणे मारहाण

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरीही यावर प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण या तरुणाचं कौतुक करत आहेत तर, आई ही आईच असते अशी कमेंट एकानं केली आहे.

Story img Loader