Son Surprised Father With PSI Result: आपल्या मुलांची प्रगती पाहून आपल्यालाही प्रचंड आनंद होतो. त्यातून जर का आपल्या मुलानं किंवा मुलीनं आपल्याला सरप्राईज केले तर मात्र पालकांचा आनंद हा द्विगुणित झाल्याशिवाय राहत नाही. खरंतर वेगवेगळ्या परीक्षांमध्ये जेवढी मेहनत मुलं घेतात तेवढीच मेहनत पालकही घेत असतात. परीक्षा जवळ आल्यावर जशी धाकधूक मुलांना असते तशीच पालकांनाही होते. पण जेव्हा मुलं ही परीक्षा चांगल्या मार्काने पास करतात तेव्हा मात्र आई-वडिलांचा आनंद गगनात मावेनासा होतो. मुलांना मिळालेल्या यशाचा जर सर्वात जास्त आनंद कोणाला होत असेल तर तो पालकांना होतो. असाच एक हृदयस्पर्शी व्हिडीओ आता समोर आला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर, यशस्वी लोकांचे अनेक व्हिडीओ समोर येतात, जे चेहऱ्यावर हसू आणतात. नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेव्हा गोकुळने परीक्षा पास केली, तेव्हा त्याने आपल्या वडिलांना ही आनंदाची बातमी देण्यासाठी फोन केला.

कोणत्याही आई-वडिलांना आपली मुलं आयुष्यात यशस्वी होतायत हे पाहून आनंद होत असतो. ज्यांना लहानाचं मोठं केलं, तीच मुलं एकदिवस आयपीएस, आयएएस अधिकारी होतात हे पाहताना आई-वडिलांचा ऊर किती अभिमानानं भरून येत असेल याचा कधी तुम्ही विचार केलाय का? नुसत्या विचारानंच अंगावर काटा उभा राहिला ना? अशाच प्रकारे एका मुलानं पिएसआय झाल्याचं कळताच प्रथम आपल्या वडिलांना तो निकाल सांगण्याचा विचार केला अन् फोन केला. यानंतर तो वडिलांशी फोनवर काय बोलाल हे ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही.

Abhishek Singh former IAS Officer
Abhishek Singh : पूजा खेडकरांप्रमाणेच आणखी एक माजी IAS अधिकारी अपंगत्वाच्या दाखल्यावरून चर्चेत! डान्स आणि जिमच्या व्हिडीओमुळे गोत्यात?
What is Next of kin rule
Next Of Kin नियम काय आहे? लष्करातील या नियमात सुधारणा करण्यासाठी का होतेय मागणी?
Trainee pratiksha bhosle police officer commits suicide due to lover betrayal Nagpur
प्रियकराने दगा दिल्यामुळे प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्याची आत्महत्या
Car crashes as driver loses control amid sound of Insta reel
पाच मित्र…भरधाव कार…इंस्टावर रिल टाकण्यासाठी मोबाईल हातात घेतला अन्…
kidney racket In vijaywada
मुलांच्या शिक्षणासाठी रिक्षाचालकाने किडनी विकली; पण पैशांऐवजी त्याला…
Kotak Group is the beneficiary of Adani stock fall The Hindenburg revelations claim that the costs outweigh the benefits
‘के’ म्हणजे कोटक समूहच अदानींच्या समभाग पडझडीची लाभार्थी! हिंडेनबर्गच्या खुलाशात नफ्यापेक्षा खर्चच अधिक झाल्याचा दावा
do these Morning Yoga Stretches after get up early in the morning
VIDEO : सकाळी झोपेतून उठल्यानंतर करा हे पाच योगा स्ट्रेचेस, व्हिडीओ एकदा पाहाच
OPTA initiative to prevent heart attacks an initiative of Association of Physicians of India
हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी ‘ऑप्टा’ उपक्रम, असोसिएशन ऑफ फिजिशियन्स ऑफ इंडियाचा पुढाकार

‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’

‘केल्याने होत आहे रे आधी केलेच पाहिजे’ या उक्तीप्रमाणे जिद्द व मेहनत असेल तर कोणतेही काम साध्य होते. एक दिवस आई-वडिलांचे स्वप्न साकार करायचे अशी जिद्द ठेवून गोकुळ देशमुख यांनीही मेहनतीनं यश खेचून आणलं. गोकुळ देशमुख यांची पिएसआय पदी निवड झाल्यानंतर पहिल्यांदाच वडिलांना बातमी सांगतानाचा त्यांचा क्षण सध्या व्हायरल होत आहे.

“हॅलो पीएसआय गोकुल देशमुख बोलतोय”

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, हा तरुण पीएसआय झाल्यानंतर पहिला फोन आपल्या वडिलांना लावतो आणि “हॅलो पीएसआय गोकुल देशमुख बोलतोय” असं सांगतो. हे ऐकून वडिलांच्या आनंदाला पारा उरत नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: कोल्हापुरातील रस्त्यावर अपघाताचा थरार! भरधाव कारनं दुचाकींना उडवलं, तिघांचा मृत्यू; सांगा चूक नक्की कुणाची?

हा व्हिडीओ पाहून नेटीही भावूक झाले आहेत तर अनेक प्रतिक्रिया या व्हिडीओवर देत आहेत. आई-वडिलांनी कष्ट करावं आणि पोरांनी त्याचं मोल करावं अशा प्रतिक्रिया यावर येत आहेत.