scorecardresearch

चार हात आणि पाय असणाऱ्या मुलीसाठी सोनू सूद ठरला देवदूत; उचलला शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च

सोनूने चार पायांच्या आणि चार हातांच्या मुलीवर शस्त्रक्रिया करण्यास मदत केली होती आणि या यशानंतर, त्या निष्पापाचे नशीब बदलणार आहे.

Sonu Sood became an angel for a girl with four arms and legs
सोनू सूद मदत करताना कोणाचीही जात, धर्म किंवा जन्मस्थळ बघत नाही. (Photo : Twitter/@SonuSood)

गरजूंना मदत करण्यात बॉलिवूड अभिनेता सोनू सूद सर्वात पुढे असतो. सोनू सूदने कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून हजारो लोकांना मदत केली आहे. त्याच्या या गुणामुळे लोक त्याला मसिहा म्हणू लागले आहेत. नुकत्याच समोर आलेल्या एका बातमीनुसार, सोनूने चार पायांच्या आणि चार हातांच्या मुलीवर शस्त्रक्रिया करण्यास मदत केली होती आणि या यशानंतर, त्या निष्पापाचे नशीब बदलणार आहे.

सोनू सूद मदत करताना कोणाचीही जात, धर्म किंवा जन्मस्थळ बघत नाही. इतरांना मदत करण्याची भावना त्याच्यात इतकी रुजलेली आहे की जेव्हाही कोणी सोनूला मदतीसाठी हाक मारली तेव्हा त्याने उत्तर द्यायला जराही उशीर केला नाही. सध्या चर्चा आहे ती म्हणजे बिहारच्या नवादा जिल्ह्यातील वारसालीगंज ब्लॉकच्या सौर पंचायतीची रहिवासी असलेल्या चौमुखी कुमारीची. तिला जन्मापासून चार हात आणि चार पाय आहेत. बॉलीवूड अभिनेता सोनू सूदला सोशल मीडियाच्या माध्यमातून याची माहिती मिळाल्यावर त्याने चौमुखीचे उपचार करण्यासाठी मदत करण्याचा निर्णय घेतला. सोनू सूदच्या प्रयत्नांचे फळ आहे की अडीच वर्षाच्या चिमुरडीवर यशस्वी शस्त्रक्रिया होऊ शकली.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

अडीच वर्षांची चौमुखी कुमारी सध्या ठीक आहे, तिची प्रकृतीही सुधारत आहे, पण तरीही तिला आणखी काही दिवस रुग्णालयात राहावे लागणार आहे. यानंतर ती एका सामान्य मुलाप्रमाणे हॉस्पिटलमधून बाहेर पडेल आणि सामान्य मुलाप्रमाणे जगू शकेल. चौमुखीच्या शस्त्रक्रियेचा संपूर्ण खर्च सोनू सूदने स्वतः उचलला आहे. यापूर्वी २८ मे रोजी सोनू सूद म्हणाला होता, ‘टेन्शन घेऊ नका, मी त्या मुलीवर उपचार सुरू केले आहेत. फक्त प्रार्थना करा.’

रुग्णालयातून मुलाचा मृतदेह मिळवण्यासाठी वृद्ध जोडप्याची पायपीट; ५० हजाराची लाच देण्यासाठी मागावी लागतेय भीक

Photos : मुंबईत हेल्मेट सक्तीची कडक अंमलबजावणी सुरु; पहिल्याच दिवशी ६ हजार जणांवर कारवाई

सौर पंचायतीच्या प्रमुख गुडिया यांचे पती दिलीप, चौमुखी आणि तिच्या परिवाराला घेऊन मुंबईला गेले होते. तिथे सोनू सूदने चौमुखीची भेट घेतली आणि तिला सुरतला पाठवले. सुरतमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या टीमने तिची तपासणी केली, त्यानंतर तब्बल सात तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर तिचे आयुष्य पूर्णपणे बदलले. त्याचवेळी तिच्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावरील आनंद परत आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-06-2022 at 15:06 IST