scorecardresearch

Video: मुलीच्या हट्टापायी ‘ती’ ने गायले गाणे अन् थेट सोनू सूदकडून मिळाली ऑफर

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आई मुलीच्या हट्टापायी बॉलिवूडचं गाणं गाताना दिसत आहे. या आईचे गाणे नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. तसंच या महिलेच्या गाण्याचे अभिनेता सोनू सूद यानेही कौतुक केले आहे.

Sonu Sood Offers Woman Who Went Viral For Singing Mere Naina Sawan Bhadon
photo: social media

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे लोक रातोरात स्टार झाल्याचे आपण बऱ्याच वेळा पाहिले आहे. व्हायरल झाल्यामुळे लोकांना चुटकीसरशी लोकप्रियता मिळते आणि ते लोकप्रियतेच्या शिखरावर चढतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक आई मुलीच्या हट्टापायी बॉलिवूडचं गाणं गाताना दिसत आहे. या आईचे गाणे नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले आहे. तसंच या महिलेच्या गाण्याचे अभिनेता सोनू सूद यानेही कौतुक केले आहे. शिवाय त्याने आपल्या चित्रपटात गाणे गाण्यासाठी ऑफर देखील दिली आहे.

चपात्या बनवणाऱ्या महिलेचा व्हिडिओ ट्विटरवर व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की त्या महिलेची मुलगी तिला गाणे गाण्यासाठी आग्रह करताना दिसते. मुलीच्या हट्टापायी आई गाणे गाण्यास तयार होते. आपल्या आईचे गाणे ती मुलगी स्वतःहा मोबाईलमध्ये रेकॉर्ड करते. ही महिला किशोर कुमार यांचं ‘मेरे नैना सावन भादो” हे गाणे गाताना दिसत आहे. या महिलेचा आवाज ऐकून नेटकरी भारावून गेले आहेत. कुठल्याही वाद्यशिवाय तिने गायलेले गाणे ऐकून काहीजणांना यावर विश्वासच बसत नाहीये. या महिलेच्या गाण्यावर सोनू सुदने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

येथे पाहा व्हिडिओ

सोनू सुदने दिली ऑफर

सोनू सुदने या महिलेला आपल्या चित्रपटात गाणं गाण्याची ऑफर दिली आहे. सोनू म्हणतो की, ‘तुम्ही मला फोन नंबर पाठवा, माझ्या पुढील चित्रपटात तुम्ही गीत गाणार आहात”. महिलेला ऑफर दिल्यामुळे त्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. यावर एकाने कंमेंट करत म्हटलंय की, तू भारताचा सुपरहिरो आहेस. या व्हिडिओला आतापर्यंत भरपूर व्ह्यूज मिळाले असून अनेकजण या व्हिडिओला लाईक देखील करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 18:21 IST
ताज्या बातम्या