चोरीच्या अनेक घटना आपण ऐकल्या किंवा पाहिल्या आहेत. चोरी सामान्यत: तेव्हा केली जाते जेव्हा घटनास्थळी कोणीही नसते. पण आज काल चोरटे इतके निराढवलेले आहेत आणि भरदिवसा सर्सास चोरी करतात. चोरट्यांना ना पोलिसांची भिती असते ना कायद्याची. दरम्यान सध्या एका चोरीच्या घटनेचा थरारक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओ पाहून लोकांच्या अंगावर काटा उभा राहिला आहे. ही घटना अमेरिकेतील कॉलिफॉर्निया येथील एका दुकानात घडली आहे जिथे एक चोरटा चोरी करण्यासाठी घुसला होता. पण जेव्हा दुकानात काम करणाऱ्या व्यक्तीने त्याला चोरी करण्यापासून अडवले तेव्हा काहीही विचार न करता त्याचे डोक्याला आग लावली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही घटना कॅलेफॉर्नियातील एल सोब्रांटे येथील ‘एपियन फूड अँन्ड लिकर शॉप’मधील आहे जिथे एका व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशाने शिरला होता. दारुच्या दुकानात त्यावेळी एक व्यक्ती उपस्थित होता जो दुकान सांभळत होता. डेलिस्टारच्या रिपोर्टनुसार, दुकान सांभाळणाऱ्या व्यक्तीचे नाव सुरज आहे. २२ सप्टेंबर रोजी दुकानात चोरी करण्यासाठी केंडाल बर्टन(Kendall Burton)नावाचा व्यक्ती घुसला. बर्टन दुकानात घुसताच चोरी करू लागला. सुरजला जेव्हा हे समजले तेव्हा तो लगेच त्याला पकडण्यासाठी गेला.

दुकानातून चोरलेल्या लायटर फ्लूडने लावली लाग
जेव्हा सुरजने बर्टनला वारंवार अडवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने दुकानातून चोरलेल्या लायटर फ्लूडने सुरजच्या डोक्यावर आग लावली. आग लावल्यानंतर सुरज तडफडू लागला.हे पाहून दुकानात उपस्थित असलेला दुसरा व्यक्ती बेसबॉलची बॅट घेऊन त्याच्या मदतीसाठी धावून आला. सुरजने सांगितले की, “मी चोराचा हात पकडण्याचा खूप प्रयत्न केला पण त्याने माझ्या डोक्याला आग लावली. या घटनेनंतर मी लगेच टॉयलेटच्या दिशेने पळालो आणि माझा चेहरा पाण्याने धुतला.”

हेही वाचा – बंगळुरूमध्ये फुटबॉल मॅचमदरम्यान विचित्र पोस्टर झालं व्हायरल; नेटकऱ्यांनी दिल्या मजेशीर प्रतिक्रिया

पोलिसांनी आरोपीला अटक केली.
सुरजने पुढे सांगितले की, “शॉपमध्ये ते पाच वर्षापेक्षा जास्त काळापासून काम करत आहे. अशी परिस्थिती अनेकदा आली जेव्हा मला किंवा दुकानातील इतर कर्मचाऱ्यांना चोराचा सामना करावा लागला होता. पण यावेळी जे घडले ते या आधी कधीही घडले नव्हते. “

दुकानांतील काही कर्मचाऱ्यांनी सुरजला सांगितले होते की, “घटनेदिवशी बर्टन अनेकदा लायटर फ्लूड चोरी करण्यासाठी आला होता त्यामुळे सावध राहा. पण सुरजला याची कल्पना नव्हती की, त्याच्यावर असा भयावह प्रसंग ओढावेल.” लायटर फ्लूडमुळे सुरजचा चेहरा, मान, खांदा आणि छातीपर्यंतचा भाग जळाला आहे. या घटनेमुळे त्याचा कुटुंबाला धक्का बसला आहे.

हेही वाचा – ‘वय हा फक्त आकाडाच!” १०४ वर्षाच्या आजीने केलं स्काय डायव्हिंग; जागतिक विक्रम मोडण्याचा केला प्रयत्न

३८ वर्षाच्या बर्टनला पोलिसांनी अटक केली आहे त्यावर जीवघेण्या हत्याराने हल्ला आणि जाळपोळ आणि चोरी यांसारखे अनेक गंभीर आरोप लावण्यात आल्याचे समजते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: South asian store workers head set on fire in californias bay area by thief snk
First published on: 06-10-2023 at 15:13 IST