भारतीय परंपरेनुसार नवीन घरात प्रवेश करताना किंवा नवीन गाडी घेतल्यावर त्याची आवर्जून पूजा केली जाते. याच परंपरेला दक्षिण कोरियाचे राजदूत यांनीसुद्धा फॉलो केलं आहे. भारतातील दक्षिण कोरियाचे राजदूत चांग-जे-बोक यांनी नवीन गाडीची भारतीय पद्धतीत पूजा केली आहे, जी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
भारतातील दक्षिण कोरियाच्या राजदूतांनी नवीन वाहनाची विशेष पूजा केली.. हुंडाई जेनेसिस जिवी80 (Hyundai Genesis GV80 ) असे या नवीन गाडीचे नाव आहे. ही दक्षिण कोरियातील आघाडीच्या वाहन उत्पादक कंपनीच्या हुंडाई कार होती. भारतातील दक्षिण कोरियाच्या राजदूतला दूतावासाच्या (Embassy) अधिकृत गाडीच्या रूपात त्यांना हुंडाई जेनेसिस जिवी80 ही गाडी मिळाली असून युट्यूब आणि ट्विटरवर त्याचा व्हिडीओ शेअर केला. या आनंदाच्या क्षणाला आणखीन खास करण्यासाठी त्यांनी या गाडीची पूजा केली. नवीन वाहनाची पूजा करण्यासाठी एक पुजारीदेखील बोलावून घेतला आणि विधीनुसार पूजा करून घेतली. राजदूत चांग-जे-बोक हेसुद्धा अगदी उत्साहात या पूजेत सहभागी झाले आणि पारंपरिक पोषाखात दिसले. अशाप्रकारे राजदूत यांच्या गाडीची पूजा विधीनुसार करण्यात आली. दक्षिण कोरियाचे राजदूत यांच्या गाडीची भारतीय पद्धतीत कशी पूजा केली याचा व्हिडीओ तुम्हीसुद्धा एकदा बघाच…




व्हिडीओ नक्की बघा :
भारतीय पद्धतीत केली पूजा :
भारतातील दक्षिण कोरियाच्या राजदूतांकडून सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये नवीन वाहन खरेदी केल्यानंतर त्याची भारतीय पद्धतीत पूजा करण्यात आली आहे. हुंडाई जेनेसिस GV80 ला दक्षिण कोरियाचे राजदूत यांची अधिकृत गाडी म्हणून ओळखली जाणार आहे. पुजारी यांनी अगदी भारतीय पद्धतीत गाडीची पूजा केली आहे. गाडीसमोर नारळ फोडून, गाडीच्या आतमध्ये फुलांचा हार लावून आणि अगदी शेवटी राजदूताच्या मनगटाला पवित्र धागासुद्धा बांधला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @RokEmbIndia या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच व्हिडीओला, “आमची नवीन Hyundai Genesis GV80 राजदूताचे अधिकृत वाहन म्हणून त्याची विशेष पूजा करण्यात आली! आमच्या नवीन प्रवासात सामील व्हा!” असे कॅप्शन देण्यात आले आहे. व्हिडीओ पाहून अनेक भारतीय नागरिक दक्षिण कोरियाच्या राजदूतांवर कौतुकाचा वर्षाव करताना कमेंटमध्ये दिसून आले आहेत.