एका अमेरिकन कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना खास भेट दिली आहे. लेडी बॉसने तिच्या कर्मचाऱ्यांना दोन फर्स्ट क्लास प्लेन तिकिटांसह १० हजार डॉलर्स देण्याचा निर्णय घेतलाय. हा निर्णय जाहीर करण्यासाठी लेडी बॉसने हटके पद्धत वापरली आहे. याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घोषणेनंतर कंपनीतील अनेक कर्मचारी भावूक झाले आहेत.

स्पॅनक्सची संस्थापक साराह ब्लेकली ही सर्वात तरुण महिला अब्जाधीश ठरली आहे. तिच्या या यशापूर्वी तिने घरोघरी फॅक्स मशीन विकण्याचं काम केलंय. ही कंपनी लॉन्च केल्यानंतर दोन दशकांनंतर ब्लॅकलीने १.२ अब्ज किंमतीचा करार केला. यामध्ये तिने जागतिक गुंतवणूक फर्म ब्लॅकस्टोन स्पॅनेक्समधील बहुसंख्य भागभांडवल विकत घेतले.

कंपनीला मिळालेल्या यशाच्या आनंदात नुकतंच या लेडी बॉसने तिच्या कर्मचाऱ्यांसह हे यश एखाद्या सोहळ्याप्रमाणे साजरा केलाय. याचा एक व्हिडीओ तिने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने तिच्या कर्मचाऱ्यांसाठी ही अनोखं गिफ्ट जाहीर केलंय. कंपनीतील कर्मचारी हे दुनियेच्या कोणत्याही कोपऱ्यात दोन फर्स्ट क्लास तिकीट बुक करू शकणार आहेत.

या व्हिडीओमध्ये बोलताना ती म्हणाली, “प्रत्येक कर्मचाऱ्याला दोन फर्स्ट क्लास तिकीटांसोबत १० हजार डॉलर्स मिळणार आहेत.” हा निर्णय जाहीर केल्यानंतर तिथल्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. यावेळी ब्लॅकलीने जेव्हा तिच्या कर्मचाऱ्यांना विचारलं की, तुम्ही कुठे-कुठे जाणार फिरायला? त्यावेळी काही कर्मचाऱ्यांनी हनीमूनला जाणार असल्याचं सांगितलं तर काही कर्मचाऱ्यांनी दक्षिण आफ्रिकाची सफर करण्यासाठी जाणार असल्याचं सांगितलं.

यापुढे बोलताना सारा म्हणाली, मी एक दिवस कंपनी 20 मिलियन अमेरिकी डॉलरची होईल असे सांगितले होते, तेव्हा अनेक लोक माझ्यावर हसले होते. आता कंपनी कुठे आली आहे ते पाहा.