Viral Video: सोशल मीडियावर अनेकदा आपण आईशी संबंधित अनेक पोस्ट व्हायरल होताना पाहतो. प्रत्येकाच्या आयुष्यात आई खूप जवळ असल्यामुळे अशा भावनिक पोस्ट प्रत्येकाला आवडतात. दरम्यान, एक व्यक्ती अशीही आहे जी आईच्या बरोबरीला असते आणि ती म्हणजे आपले वडील. वास्तविक, वडिलांबद्दल सोशल मीडियावर फारशा पोस्ट नाहीत. पण त्याच्याशी संबंधित व्हिडीओ किंवा पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकतेच असेच काहीसे पाहायला मिळाले. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एक दिव्यांग वडील आपल्या मुलांना सायकलवर बसवून शाळेत घेऊन जाताना दिसत आहेत. हे पाहून लाखो लोक भावूकही झाले आहेत.

(हे ही वाचा: Viral Video: सिंहाने केला बिबट्यावर जबरदस्त हल्ला, एकाच फटक्यात केली ‘अशी’ वाईट अवस्था!)

IAS अधिकाऱ्याने केला व्हिडीओ शेअर

व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ आयएएस अधिकारी सोनल गोयल यांनी ट्विटरवर शेअर केला आहे, ज्यामध्ये एक दिव्यांग व्यक्ती त्यांची सायकल चालवताना दिसत आहे. याच्या मागे शाळेचा गणवेश घातलेली त्यांची मुलगी आणि समोर मांडीवर बसलेला मुलगा दिसतो. ते शाळेत जाताना दिसत आहेत.

(हे ही वाचा: पक्ष्यांना उडवून लावण्यासाठी शेतकऱ्याने बनवले ‘अनोखे यंत्र’, video पाहून मोठे अभियंतेही होतील थक्क!)

(हे ही वाचा: Video Viral:…आणि काही सेकंदात सापाने केली उंदराची शिकार)

व्हिडीओने जिंकली नेटीझन्सची मनं

वडिलांचे मुलांवर असलेले प्रेम या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे. लाखो लोकांची मनं या व्हिडीओने जिंकली आहेत. आत्तापर्यंत या व्हिडीओला सोशल मीडियावर एक लाख ५२ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. नेटीझन्सने वडिलांबद्दलची कृतज्ञता आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी यूजर्सने कमेंट्सही केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Specially abled father drops off kids to school on tricycle heartwarming video goes viral ttg
First published on: 28-05-2022 at 11:42 IST