Shocking truck accident video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. इतका भीषण अपघात क्वचितच कोणी पाहिला असेल आणि क्वचितच कुठे झाला असेल. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक ट्रक एकाच वेळी चार गाड्यांना चिरडताना दिसत आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, व्हिडीओ पाहून तुमचाही थरकाप उडेल.
एवढा भयानक अपघात कधीच पाहिला नसेल
अनेकदा आपण कितीही व्यवस्थित गाडी चालवण्याचा प्रयत्न केला, तरी समोर कोणी चुकीच्या पद्धतीने गाडी चालवत असेल तर अपघात हे होतातच. अशावेळी समोरच्या व्यक्तीच्या चुकीची शिक्षा इतरांनाही भोगावी लागते. सध्या समोर आलेल्या प्रकरणातही असंच काहीसं घडलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून असं वाटतंय, जणू मृत्यूचाच पाठलाग ट्रकचालकानं केला. एवढा भयानक अपघात तुम्ही कधीच पाहिला नसेल.
दुभाजकाला धडकला, नंतर चार वाहनांना जोरदार धडक
व्हायरल झालेला व्हिडीओ एका हायवेचा आहे, ज्यावर ट्रॅफिक जाम झाल्यामुळे बऱ्याच गाड्या एकामागोमाग उभ्या आहेत. यावेळी भरधाव वेगात पाठीमागून ट्रक येतो, आधी दुभाजकाला धडकतो आणि त्यानंतर एकाच वेळी चार कारना उडवतो. कार आणि ट्रकची ही धडक एवढी भीषण आहे की, वाहनं चक्काचूर झाली आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर असे वाटते की, या अपघातात एकाचाही जीव वाचला नसावा. व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवण्यात आलेला अपघात रशियाच्या चेल्याबिन्स्क भागातील आहे, जिथे एम-5 हायवेवर हा भीषण अपघात झाला. Ruptly.tv या आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेनुसार, या अपघातात दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सात जण गंभीर जखमी झाले होते.
पाहा व्हिडीओ
अनेक जण हा व्हिडीओ कर्नाटकातील म्हैसूर येथील आहे, असे सांगून सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत. व्हिडीओ शेअर करताना दावा केला जात आहे की, ही घटना केंगेरीजवळ म्हैसूर रोडवर घडली, ज्याचे नुकतेच रेकॉर्डिंग झाले आहे. या अपघातात एकाचाही जीव वाचला नसल्याचीही अफवा सोशल मीडियावर पसरली होती. मात्र, हा व्हिडीओ रशियातील आहे. या प्रकरणाचा पहिला व्हिडीओ १७ जून २०२० रोजी प्रेस प्लस नावाच्या YouTube चॅनेलवरून YouTube वर अपलोड करण्यात आला होता. मात्र, आता तो पुन्हा एकदा व्हायरल होत आहे.
© IE Online Media Services (P) Ltd