scorecardresearch

१ वर्षानंतर झेवियर्सचा ‘मल्हार फेस्टीव्हल’ पुन्हा भेटीला

मागच्या वर्षी ब्रेक घेतल्या नंतर यंदा आंतरमहाविद्यालयीन मल्हार फेस्टीव्हल सगळ्यांच्या भेटीला येत आहे. कोविड -१९ च्या प्रभावावरून प्रेरित होत यंदाच्या थीम ठरवण्यात आली आहे.

St. xaviers college inter collegiate festival Malhar
१ वर्षानंतर झेवियर्सचा ‘मल्हार फेस्टीव्हल’ पुन्हा भेटीला येत आहे

कॉलेज, कॉलेज कॅम्पस, दरवर्षी होणारे फेस्टिव्हल, खेळांच्या स्पर्धा आणि अजून बऱ्याच गोष्टी आजची तरुणाई हमखास मिस करत आहे. कॉलेज फेस्टीव्हल हा तर कॉलेज लाइफ मधला महत्त्वाचा इव्हेंट असतो. कोविड-१९ मुळे मागच्या वर्षांपासून कॉलेज बंद असल्या कारणामुळे कॉलेज फेस्टीव्हल होत नाहीयेत. पण यंदा हळू हळू ऑनलाइन पद्धतीने हे कॉलेज फेस्टीव्ह सुरु होत आहेत. मुंबईतील कॉलेज फेस्टीव्हल हे मुंबईतील संत झेवियर्स महाविद्यालयाच्या ‘मल्हार’ पासून सुरु होतात. मागच्या वर्षी ब्रेक घेतल्या नंतर यंदा आंतरमहाविद्यालयीन मल्हार फेस्टीव्हल सगळ्यांच्या भेटीला येत आहे. काय खास आहे या फेस्टीव्हलमध्ये ते जाणून घेऊयात.

४२ वर्षे जुना मल्हार फेस्टीव्हल

आशियातील सर्वात जुना आणि सर्वात मोठा आंतरमहाविद्यालयीन महोत्सव म्हणून ओळखला जाणारा मल्हार हा संत झेवियर्स महाविद्यालय मुंबई येथील विद्यार्थ्यांद्वारे दरवर्षी आयोजित केला जातो. १९७९ मध्ये सुरू झालेल्या मल्हार ने गेल्या ४२ वर्षांपासून एक अभूतपूर्व अनुभव दिला आहे. या फेस्टीव्हलमध्ये मुंबई आणि उपनगरातील कॉलेजमधील अनेक विद्यार्थ्यांसह इतर शहरातील विद्यार्थीही भाग घेत असतात.  मल्हारमध्ये विद्यार्थ्यांना कला, नाटक, संगीत, नृत्य आणि साहित्य यासह इतर क्षेत्रांमध्ये स्पर्धा आयोजित करून त्यांच्यातील कलागुण प्रदर्शित करण्यासाठी व्यासपीठ देतो.

यंदा फेस्टीव्हल कधी?

कोविड १९ च्या महामारी मुळे, मल्हार २०२० रद्द करावा लागला होता. यामुळे  मल्हारबद्दल उत्साही असणारे विद्यार्थी, विशेषत:  झेविअराईट्स निराश झालेले. पण यंदा मल्हार फेस्टीव्ह २९ ऑगस्ट रोजी होणार आहे. यावेळी १ दिवसाचाचं फेस्टीव्ह असणार आहे. हा फेस्टीव्हल ऑनलाइन होणार आहे. ‘१ वर्षानंतर मल्हार त्याच जोशाने तुमच्या भेटीस परत येत आहे.’ असं कॉलेजचे विद्यार्थी सांगतात.

यंदाची थीम काय आहे?

दर वर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील मल्हार एक धमाकेदार थीम घेऊन येत आहे.  या मल्हार २०२१ ची थीम  ‘पॅरलॅक्स: द लेगसि रिरुटेड’ अशी आहे. भूतकाळ आणि भविष्यकाळ एकत्र आणणे, वारसा अबाधित ठेवून प्रवासाची दिशा बदलणे हा मल्हार पॅरलॅक्स चा उद्देश्य आहे. मल्हार बद्दल असलेल्या भावना, आता ऑनलाइन सेटिंगमध्ये वेगळ्या प्रकारे दर्शविल्या जातील.  तथापि,  हा ४२ वर्षांचा वारसा आहे, जो मल्हार पॅरालॅक्स अधिक बळकट करण्याचा प्रयत्न करीत आहे. पॅरालॅक्स चा उद्देश्य म्हणजे लोकांना एक निराळा ऑनलाईन दृष्टिकोन देणे आणि त्यासाठीच हा वारसा पुढे चालू ठेवून मल्हार एक रिरुटेड ऑनलाइन प्लॅटफॉर्म चा वापर करत आहे.

थीमवर आधारित खास व्हिडीओ

मल्हार फेस्टीव्हलची थीम ‘पॅरलॅक्स: द लेगसि रिरुटेड’ वर आधारित एक छोटा व्हिडीओ कॉलेजने नुकताच त्यांच्या फेस्टिव्हलच्या सोशल मीडियावरून प्रसारित केला आहे. या व्हिडीओमधून तुम्हाला नक्की थीम काय आहे हे सहज समजून येईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Malhar’21 (@malharfest)

हा पूर्ण व्हिडीओ विद्यार्थ्यांनीच बनवलेला आहे.

 

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-08-2021 at 12:51 IST

संबंधित बातम्या