Inspirational Struggle Stories :संघर्ष कोणाला चुकला आहे. संघर्ष हा आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. प्रत्येकाच्या वाट्याला कोणता ना कोणता संघर्ष असतो. काहीजण संघर्षाला तोंड देताना हार मानतात आणि काहीजण काहीही झाले तरी हार न मानता संघर्ष करत राहात. असेच लोक इतरांसाठी प्रेरणा ठरतात. सोशल मीडियावर रोज तुम्ही कित्येक लोकांच्या संघर्षाची गोष्ट आपण अनेकदा ऐकतो; पण काही व्यक्ती आपल्या जगण्याच्या दृष्टिकोनालाच नवा अर्थ देऊन जातात. ५२ वर्षीय वीणा देवी त्यापैकीच एक. ५० टक्के पक्षाघात(पॅरालिसिस ) झाल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. Zepto मध्ये डिलिव्हरी एजंट म्हणून काम करत त्या रोज आपल्या स्कूटरवर शहरभर फिरतात. या धडाडीच्या महिलेच्या संघर्षाची गोष्ट अभिनेत्री आणि मॉडेल मलायका अरोराने सोशल मीडियावर शेअर केली आणि क्षणातच हा व्हिडिओ व्हायरल झाला.

५०%पक्षाघात, पण जिद्दी सोडली नाही (Fighting paralysis with unbreakable willpower)

मलायका अरोरा एका रस्त्यावर वीणा देवी यांना भेटल्या. स्कूटरवर ठेवलेली काठी पाहून त्यांनी सहज विचारलं, “तुम्हाला पायांचा काही त्रास आहे का?” यावर शांतपणे उत्तर देताना वीणा म्हणाल्या, “मला ५० टक्के अंपगत्व आहे.”

पण त्यांची बोलण्याचा अंदाज जणू सांगत होता की, काहीही झालं तरी ‘काम’ आणि ‘आत्मसन्मान’ हेच माझे साथीदार राहणार.

वीणा देवी सांगतात की”त्या गेल्या वर्षी जूनपासून Zepto मध्ये काम करत आहेत. वय ५२, त्यांचे अर्धे शरीर साथ देत नाही, पण मन मात्र अखंड धावतंय!

“बास, अशीच मदत करत राहा”: साधा पण मनाला भिडणारा संदेश (A dignified and humble message that stays with you)

मलायकाने त्यांना विचारलं, “जर कोणाला तुम्हाला मदत करायची असेल तर कसे करू शकतात?”

यावर वीणा देवींचं उत्तर सोशल मीडियावर सर्वांना भारावून गेलं— “बास, अशीच मदत करत राहा.

ना कोणती मागणी, ना अपेक्षा. फक्त सन्मान आणि कृतज्ञता. याच एका वाक्यात या महिलेनं आयुष्याचं तत्वज्ञान सांगून टाकलं.

“त्या खरोखर एक प्रेरणा आहेत”: मलायका भावूक, प्रेक्षक चकित (Mallika moved, viewers deeply inspired)

मलायका अरोरा या भेटीनं स्पष्टपणे हेलावल्या. कॅमेऱ्याकडे पाहत त्या म्हणाल्या—“हे बघा,रडू नको. आयुष्य खूप मौल्यवान आहे” ही भावना हजारो लोकांच्या कमेंट्समध्ये उमटताना दिसली.

“अशा स्त्रियांनीच जग चालतं,” “काय ताकद आहे बाईमध्ये!”, “हीच खरी प्रेरणा!”—अशा प्रतिक्रिया सतत येत आहेत.

Zepto नेही व्हिडिओवर कमेंट करत वीणा देवींचा अभिमान व्यक्त केला.

कष्टाची शिदोरी आणि आत्मसन्मानाची काठी (The backbone of dignity and hard work)

प्रत्येक ऑर्डरसह त्या फक्त डिलिव्हरी करत नाहीत, तर स्वत:ची जिद्द, धैर्य आणि कामावरील निष्ठा जगासमोर ठेवतात.

व्हिडिओतील त्यांचे हसू, त्यांची साधी वाक्यं, आणि त्यांच्या डोळ्यातील आत्मविश्वास—हे सर्व मिळून एकच संदेश देतात:

शरीर थांबलं तरी मनाला कधीच थांबू नये.