आजवर आपण अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. सध्या असाच एक विचित्र खेळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या खेळाचे नाव आहे आहे ‘पॅन स्लॅप कॉंटेस्ट’ (Pan-slapping contest). अनेक लोक या स्पर्धेत भाग घेताना दिसत आहेत.

एनबीएचे माजी खेळाडू रेक्स चॅपमॅन यांच्या ट्विटर अकाउंटवरून शेयर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये दोन व्यक्ती पाळी पाळीने एकमेकांच्या डोक्यावर वार करताना दिसत आहेत. या दोघांनी आपल्या डोक्यात स्टीलचे हेल्मेट घातले आहे. प्रतिस्पर्ध्याच्या डोक्यावर वार करताना ते एका पॅनचा वापर करत आहेत. त्यांच्या आजूबाजूला अनेक लोक उभे असून या खेळाचा आनंद घेत आहेत.

“याला म्हणतात आविष्कार”; झाडावरून फळं तोडण्यासाठी केलेल्या हटके जुगाडामुळे आनंद महिंद्रा झाले प्रभावित

पॅनने केले जाणारे ही वार अतिशय तीव्र असून हे हेल्मेट स्पर्धकांचा गंभीर दुखपतीपासून बचाव करतात. हे दोन्हीही स्पर्धक एकमेकांना तोपर्यंत मारतात जोपर्यंत दोघांपैकी एकजण खाली पडत नाही. पोस्ट झाल्यानंतर लगेचच या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत अडीच मिलियनपेक्षाही जास्त वेळा पाहिला गेला आहे. तसेच या व्हिडीओला सात हजारांहूनही अधिक लाइक मिळले आहेत.

या व्हिडीओवर एक युजरने मस्करीत कमेंट केली आहे, ‘माझ्या लोकांच्या परांपरांची थट्टा करू नये.’ तसेच अन्य एक युजरने कमेंट केली, ‘मी आशा करतो की कोणालाही गंभीर दुखापत झाली नसावी मात्र हे पाहताना खूपच मजा येत आहे. येणाऱ्या काळात हा खेळ पृथ्वीवरील सर्वात मजेशीर खेळ बनेल.’

Viral Video: स्कुटी आहे की लॉरी? ‘या’ माणसाची गाडी चालवण्याची पद्धत पाहून व्हाल हैराण!

‘पॅन स्लॅप कॉंटेस्ट’ ही अशी एकमेव प्रतियोगिता नाही जी विचित्र आहे. याउलट जगभरात अशा अनेक स्पर्धा आहेत. गेल्या मार्च महिन्यात, हॉलिवूड अभिनेता अर्नोल्ड श्वार्झनेगरने आयोजित केलेल्या खेळ महोत्सवात ‘स्लॅप फायटिंग चॅम्पियनशिप’ हे वर्जिन लॉंच करण्यात आले होते.

अधिकृत नियमांनुसार, ‘स्लॅप फायटिंग चॅम्पियनशिप’च्या प्रत्येक फेरीमध्ये स्पर्धकाला आपल्या प्रतिस्पर्ध्याला कानाखाली मारायची असते. अशा एकूण तीन फेऱ्या असतात. या स्पर्धेत खणाखाली मारली गेल्यानंतर परिक्षकांद्वारे हे तपासले जाते की स्पर्धक पुढील फेरी खेळण्यासाठी सक्षम आहे किंवा नाही. जो स्पर्धक पुढील फेरीसाठी सक्षम नसेल त्याला बाद केले जाते. हा निर्णय परिक्षकांवर अवलंबून असतो. ‘स्लॅप फायटिंग चॅम्पियनशिप’च्या आधी अमेरिकेने जानेवारी महिन्यात ‘पिलो फायटिंग चॅम्पियनशिप’चे आयोजन केले गेले होते.