देशात भटक्या श्वानांनी नागरिकांना लक्ष केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. यात अनेक नागरिक जखमी झाले आहेत तर काहींचा मृत्यू देखील झालेला आहे. अनेकवेळा अशा घटनांचे वृत्त समाज माध्यमांमध्ये झळकले असून भटक्या श्वानांच्या मुसक्या आवळण्यासाठी प्रशासन काय करत आहे, असा सवाल देखील केला जातो. दरम्यान, भटके श्वान किंती हिंसक होऊ शकतात याची प्रचिती करून देणारा एक व्हिडिओ समाज माध्यमावर प्रसिद्ध झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कुत्रे पाठलाग करू लागताच विद्यार्थ्यांनी..

व्हिडिओ केरळमधील कन्नूर येथील आहे. यात दोन विद्यार्थ्यांच्या मागे भटके श्वान लागल्याचे दिसून येत आहे. दोन्ही मुले धावत एका घरात प्रवेश करतात. श्वान मागे लागल्याने ते वेगाने त्या घरात शिरतात आणि प्रवेशद्वार लावून घेतात. सुदैवाने ही मुले श्वानांच्या तावडीत सापडली नाही, त्यामुळे हाणी टळली. श्वानांनी थेट प्रवेशद्वारापर्यंत मुलांचा पाठलाग केला. प्रवेशद्वार बंद केल्यानंतर गटाने आलेले श्वान माघारी पलटले.

(Viral : विद्यार्थ्याने दाखवले माणूसकीचे दर्शन, भूकंपात जखमी मित्राच्या मदतीला धावला, पाहा व्हिडिओ..)

व्हिडिओच्या शेवटी परत काही श्वान एका व्यक्तीच्या मागे लागल्याचे दिसून येत आहे. यातून ही समस्या किती गंभीर आहे हे दिसून येते. गटाने पाठलाग करणारे हे श्वान अनर्थ देखील घडवू शकतात. हा व्हिडिओ व्हायरल होत चालला आहे. एएनआयने आपल्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

नेटकरी म्हणाले..

नेटकऱ्यांनी या व्हिडिओवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने मुलांना काही झाले नसल्याने ‘राहत की सांस’ अशी प्रतिक्रिया देत आनंद व्यक्त केला, तर एकाने अशा घटना त्याच्या भागात होतात, मात्र आवाज उठवल्यास तुम्हाला कुत्रे आवडत नाही, असे बोलल्या जात असल्याची तक्रार व्यक्त केली आहे.

(Viral : कोरीयन तरुणांना ‘काला चष्माची’ भुरळ, गाण्यावर केला भन्नाट डान्स; पाहा व्हिडिओ)

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Stray dog follow students in kannur in kerala ssb
First published on: 13-09-2022 at 11:06 IST