Street Girlfriends In China : जग झपाट्याने बदलतेय. त्यानुसार लोकांची विचारसरणीही बदलतेय, प्रेम व्यक्त करण्याची अन् व्यवसाय करण्याची पद्धत बदलत आहे. कालपर्यंत लोक प्रेमात एकमेकांच्या जवळ यायचे आणि नाते निर्माण करायचे; पण आता हे सर्व पैशांच्या जोरावर केले जाते. पैसे देऊन तुम्ही हव्या त्या व्यक्तीवर प्रेम करू शकता. याच बदलत्या काळानुरूप स्ट्रीट गर्लफ्रेंड नावाचा नवा ट्रेंड सुरू झाला आहे. हा नवा ट्रेंड जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

स्ट्रीट गर्लफ्रेंड सर्व्हिस म्हणजे काय? (what is street girlfriend trend)

जगातील अनेक देशांमध्ये तुम्ही भाड्याने गर्लफ्रेंड बनवू शकता. म्हणजे काही तासांसाठी पैसे देऊन तुम्ही मुलीला तुमची प्रेयसी मानू शकता. या तासांमध्ये ती मुलगी तुमच्यावर तशीच प्रेम करेल; ज्याप्रमाणे एखादी गर्लफ्रेंड तिच्या बॉयफ्रेंडवर प्रेम करते. चीन या बाबतीत इतर देशांच्या पुढे गेला आहे. सध्या चीनमध्ये हा ट्रेंड जोरदार प्रमाणात सुरू आहे. तिथे मुलींचा एक गट (ज्या स्वत:ला स्ट्रीट गर्लफ्रेंड म्हणवतात) त्यांच्या विविध सेवांच्या (सर्व्हिसेसच्या) किमतींचा चार्ट घेऊन रस्त्यावर बसतात आणि १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना स्ट्रीट गर्लफ्रेंडच्या सेवा देतात.

Ram Gopal Varma on Malayalam cinema
एकेकाळी मल्याळम सिनेमांना ‘सेक्स फिल्म’ म्हणायचे, बॉलीवूड दिग्दर्शकाचे विधान; म्हणाले, “आता सर्वोत्कृष्ट चित्रपट…”
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
US Man Asks Flight Attendant For Sex
US Man Asks Flight Attendant For Sex: विमानात प्रवाशाचे अश्लाघ्य कृत्य; एअर होस्टेसकडे लैंगिक सुखाची मागणी, कपडे उतरवून…
sai tamhankar talks about sex education
“आपल्या देशात सेक्सला फार कमी महत्त्व दिले जाते”, सई ताम्हणकरचे विधान; म्हणाली, “या गोष्टीकडे…”
Badlapur Crime News
Badlapur Sex Assault : बदलापूरच्या शाळेच्या विरोधात पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल, लैंगिक अत्याचार प्रकरणात SIT ची कारवाई
Abhishek Bachchan reacts on divorce rumors with Aishwarya Rai
ऐश्वर्या रायपासून घटस्फोट घेण्याच्या चर्चांवर अखेर अभिषेक बच्चनने सोडलं मौन; म्हणाला…
Badlapur Sexual Assault Marathi Actor Post
Badlapur Sexual Assault : “जबरदस्तीने स्त्रीचे कपडे काढले जातात, पण…”; बदलापूरमधल्या घटनेवर मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
Radikaa Sarathkumar says men secretly record videos of actresses in the nude
“अभिनेत्रींचे नग्न व्हिडीओ रेकॉर्ड करतात,” ज्येष्ठ अभिनेत्रीचा मोठा दावा; म्हणाल्या, “माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये…”

Read More Trending News : भावांनो, ट्रेन स्वच्छ करण्याची ही कोणती पद्धत?; मजेशीर VIRAL VIDEO पाहून तुम्हालाही येईल पोट धरून हसू

कोणत्या प्रकारच्या सेवा उपलब्ध? (china street girlfriend trend)

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, चीनमध्ये या स्ट्रीट गर्लफ्रेंड्स सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. विशेषत: अविवाहित तरुण मुले त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत. जर एखाद्या तरुण मुलाला या स्ट्रीट गर्लफ्रेंडकडून सेवा घ्यायची असेल आणि त्याच्या एकाकीपणावर मात करायची असेल, तर त्याला वेगवेगळ्या सेवांसाठी वेगवेगळी किंमत द्यावी लागते.

उदाहरणार्थ- जर एखाद्या तरुणाला फक्त मिठी मारायची असेल, तर त्याला त्यासाठी त्याच्या स्ट्रीट गर्लफ्रेंडला एक युआन द्यावा लागेल. भारतीय रुपयांत ही किंमत अंदाजे ११ रुपये आहे. जर त्याला त्याच्या स्ट्रीट गर्लफ्रेंडचे चुंबन (किस) घ्यायचे असेल, तर त्याला १५ युआन द्यावे लागतील. भारतीय रुपयांत ही किंमत अंदाजे ११५ रुपये आहे.

जर तुम्हाला स्ट्रीट गर्लफ्रेंड तुमच्याबरोबर घरी यावी आणि तुमच्या घरातील कामांत तिने मदत करावी, असे वाटत असेल, तर तुम्हाला त्यासाठी २० युआन खर्च करावे लागतील. जर तुम्हाला तुमच्या स्ट्रीट गर्लफ्रेंडबरोबर बसून दारू प्यायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला ४० युआन खर्च करावे लागतील. ४० युआन म्हणजे भारतीय रुपयांमध्ये अंदाजे ४६१ रुपये आहेत.

SCMP नुसार, फक्त एका आउटिंगमध्ये १०० युआन (जवळपास १२०० रुपये) द्यावे लागतात.

इतर कोणत्या सेवा उपलब्ध आहेत?

स्ट्रीट गर्लफ्रेंड चुंबन आणि मिठीव्यतिरिक्त इतर सेवादेखील देतात. उदाहरणार्थ- जर तुम्हाला स्ट्रीट गर्लफ्रेंडबरोबर चित्रपट पाहायचा असेल, तर तुम्हाला त्यासाठी १५ युआन खर्च करावे लागतील. दरम्यान, सोशल मीडियावरही स्ट्रीट गर्लफ्रेंड सर्व्हिसची चर्चा सुरू आहे. अनेकांना ही वेश्या व्यवसायाची संकल्पना बदलणारी गोष्ट वाटते.