सोशल मीडियाच्या जगात व्हायरल होणाऱ्या गोष्टींचा वेग दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत हजारो व्हिडीओ, रील्स आणि पोस्ट्स आपल्या मोबाईल स्क्रीनवर येत असतात आणि आपण पाहतोही. यातील काही रील्स क्षणभर हसवतात, काही विचार करायला लावतात, तर काही इतके अनपेक्षित असतात की ते पाहून आश्चर्य वाटते. हल्ली लोक केवळ मोठ्या घटना नाही, तर अगदी छोट्या, साध्या आणि विनोदी प्रसंगांनाही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देतात. खासकरून रस्त्यावरचे, सर्वसामान्य लोकांशी संबंधित व्हिडीओ प्रेक्षकांना अधिक आवडतात. अशाच एका साध्या पण भन्नाट प्रसंगाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून, तो पाहून अनेकजण हसत आहेत, तर काही जण त्यातील घडलेल्या प्रसंगावर चर्चा करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एक तरुणी आपल्या मित्र-मैत्रिणींसोबत रस्त्यावरील पाणीपुरी विकणाऱ्या एका विक्रेत्याजवळ उभी असल्याचे दिसते. बोलता बोलता ती तरुणी सांगते की, गेल्या पाच महिन्यांपासून तिचा पगार झालेला नाही, तसेच तिच्या मित्रांचाही पगार झालेला नाही. त्यानंतर ती पाणीपुरीवाल्याला त्याचे एक पोस्टर दाखवते आणि अगदी प्रोफेशनल अंदाजात विचारते की, “मी तुमच्यासाठी असं एक पोस्टर डिझाइन करून देऊ का?” मात्र, तिच्या या ऑफरवर पाणीपुरीवाल्याने दिलेले उत्तर सगळ्यांनाच आश्चर्यचकित करणारे ठरते.

तो अगदी शांतपणे म्हणतो, “नाही, माझ्याकडे canva आहे.” हे उत्तर ऐकताच तरुणी पूर्णपणे तोंडावर पडते. तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदलतात आणि ती काहीही न बोलता मागे वळते. हा संपूर्ण प्रसंग इतका अनपेक्षित आणि मजेशीर आहे की तो पाहणाऱ्यांना हसू आवरता येत नाही. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर bearded.bhatia या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून, काही तासांतच तो लाखो लोकांपर्यंत पोहोचला.

पाहा व्हिडीओ

या व्हिडीओवर सोशल मीडियावर प्रचंड प्रतिक्रिया आल्या आहेत. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये “आधीच ऑरा शून्यावर होता, आता तर तो माइनसमध्येच गेला आहे” असे लिहिण्यात आले आहे, जे अनेकांना चांगलेच भावले. या व्हिडीओला तब्बल १४ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे, प्रसिद्ध डिझायनिंग प्लॅटफॉर्म Canva ने सुद्धा या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत “Faaaaa” असे लिहिले आहे, ज्यामुळे हा व्हिडीओ आणखी चर्चेत आला. अनेक युजर्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

एका युजरने “गरिबीत भर म्हणजेच अधिकचं संकट” असे लिहिले, तर दुसऱ्याने “सॅवेज!” अशी प्रतिक्रिया दिली. काहींनी हसण्याचे इमोजी टाकत व्हिडीओचा आनंद घेतला. एका साध्या पाणीपुरीवाल्याच्या उत्तराने सोशल मीडियावर मोठी धमाल केली असून, हा व्हिडीओ अजून काही काळ चर्चेत राहण्याची शक्यता आहे.