‘अननसाचे मोमो’ कधी खाल्ले आहेत का? नसेल तर ‘हा’ व्हायरल व्हिडीओ पाहा, विचित्र प्रयोग पाहून संतापले लोक

मोमोज हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड बनले आहेत कारण ते जवळजवळ प्रत्येक काना-कोपऱ्यात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. काहींना व्हेज मोमोज आवडतात तर काहींना नॉन व्हेज मोमोज. पण कधी तुम्ही अननसाचे मोमोज पाहिले आहेत का? नसेल पाहिले तर हा व्हायरल व्हिडीओ नक्की पाहा.

Street vendor’s pineapple momos fail to impress netizens watch video
अननासाचे मोमो खाल्ले आहेत का? ( फोटो सौजन्य – इंडियन एक्सप्रेस)

सोशल मीडियावर नेहमी विचित्र खाद्यपदार्थांचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही खाद्य पदार्थांवरील प्रयोग लोकांना आवडतात तर काही असे असतात जे खाऊन लोकांना विश्वास बसणार नाही. ओरिओ मॅगीपासून ते भेंडी समोसपर्यत लोकांनी कित्येक विचित्र पदार्थाचे व्हिडीओ लोकांनी पाहिले आहेत. आता असाच एक विचित्र खाद्यपदार्थ समोर आला आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मोमोज हे भारतातील सर्वात लोकप्रिय स्ट्रीट फूड बनले आहेत कारण ते जवळजवळ प्रत्येक काना-कोपऱ्यात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहेत. काहींना व्हेज मोमोज आवडतात तर काहींना नॉन व्हेज मोमोज. पण कधी तुम्ही अननसाचे मोमोज पाहिले आहेत का? नसेल पाहिले तर हा व्हायरल व्हिडीओ नक्की पाहा.

हेही वाचा – आग लागलेल्या इमारतीत अडकली होती २ वर्षाची चिमुकली, दिल्ली पोलिस अधिकाऱ्याने वाचवले प्राण

विचित्र खाद्यपदार्थांचा हा व्हिडीओ जतिन कुमारने इंस्टाग्रामवर sun_kaha_chale नावाच्या प्रोफाइलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये चक्क अननसाचे मोमो कसे तयार केले जात आहे हे दिसते आहे. व्हिडीओमध्ये पाहू शकता की, कसा विक्रेता अननसाचे छोटे तुकडे करून मोमोजमध्ये भरत आहे. नंतर तो मोमोज डीप फ्राय करतो आणि प्लेटमध्ये सर्व्ह करतो.

हा व्हायरल व्हिडीओ पाच आठवड्यांपूर्वी शेअर केला होता आणि बघता बघता तो सर्वत्र व्हायरल झाला आहे. हा विचित्र खाद्यपदार्थ पाहून लोक थक्क झाले आहेत. तर काही लोक आपल्या मित्रांना टॅग करून आपल्या मित्रांना मोमोज खाण्याचा सल्ला देत आहेत.

हेही वाचा – हौस पडली महागात! आकाशपाळण्यात अडकले तरुणीचे केस; जत्रेतील थरारक व्हिडीओ होतो व्हायरल

विचित्र प्रयोग पाहून संतापले लोक

व्हायरल व्हिडिओवर एकाने लिहिले की, ”गरूड पुराणात यासाठी वेगळी शिक्षा दिली आहे.” दुसर्‍याने सांगितले की, ”मी त्या दिवशी २ वाजेपर्यंत रडलो.” त्याचवेळी एका व्यक्तीने लिहिले ”अरे देवा, हे सगळं काय पाहावं लागतं आहे? त्याचप्रमाणे अनेक युजर्सनी या मोमोच्या विचित्र प्रयोगाला निरुपयोगी म्हटले आणि व्हायरल व्हिडिओवर मजेदार कमेंट्स केल्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Street vendors pineapple momos fail to impress netizens watch video snk

First published on: 30-09-2023 at 15:12 IST
Next Story
“पाकिस्तानच्या खांद्यावर भगवा..”, भारतात आलेल्या बाबर आझम, शाहीनचे फोटो बघून ‘मीमर्स’ झाले लोटपोट