Nashik School video: शाळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्त्वाचा आणि सर्वात सुंदर काळ असतो. शाळेतील दिवस आठवले तरी चेहऱ्यावर नकळत एक हसू येतं. गणित-विज्ञानाचा तास बुडवण्यापासून ते स्नेहस्नमेलनात नाचण्यापर्यंत शाळेच्या लाखो आठवणी झरकन डोळ्यासमोरून जातात. शाळेतील विविध उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील सर्वात आनंदाचा दिवस कारण त्या दिवशी अभ्यास नसतो, कोणत्याही शिक्षकांचा तास नसतो तर फक्त आणि फक्त मज्जा असते. अनेक उत्साही विद्यार्थी डान्स करतात, नाटक सादर करतात सर्वांचे कौतुकही मिळवतात. अशा काही विद्यार्थ्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांना त्यांच्या शाळेतील दिवस आठवले आहेत.

जिल्हा परिषद नाशिक येथील मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या नेतृत्त्वाखाली मुख्यमंत्रीसमृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी केवळ शिक्षणातच नाही तर कला, नृत्य आणि संस्कारातही पुढे आहेत हे या व्हिडीओमधून पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये दोन विद्यार्थीनी शाळा मराठी माझी शाळा मराठी या गाण्यावर डान्स करत असल्याचे दिसत आहे. विद्यार्थी अफलातून डान्स करतच आहे पण सर्वांचे लक्ष वेधले आहे. विद्यार्थ्यांच्या बरोबरीने उत्साह आणि उर्जा असलेले शिक्षकही लक्ष वेधत आहे.

पूर्वीच्या शालेय जीवनात आणि आताच्या शालेय जीवनात खूप जमीन आस्मानाचा फरक आहे. पूर्वी विद्यार्थी शिक्षकांसोबत बोलायला देखील घाबरायचे, पण हल्लीचे विद्यार्थी शिक्षकांसोबत मजामस्ती करताना दिसतात. शिवाय सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे शाळेतील शिक्षकदेखील विद्यार्थ्यांसोबत रिल्स बनवताना दिसतात.रोज रोजच्या अभ्यासाने विद्यार्थी देखील कंटाळलेले असतात. या विद्यार्थ्यांना अशा उपक्रमांमुळे एक ऊर्जा मिळते आणि शाळा हवीहवीशी वाटते.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ zpnashikofficial नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडीओ पाहून अनेकांना शिक्षकांच्या उत्साहाचे कौतुक केले तर काहींनी मराठी शाळेचे कौतुक केले.