स्मार्टफोनमुळे आपली अनेक कामे सोपी झाली आहेत. या एका उपकरणाच्या मदतीने आपण कित्येक कामं करू शकतो. पण सगळ्यात कमालीची गोष्ट म्हणजे या मोबाईलच्या सहाय्याने प्रत्येकजण स्वतः स्वतःचे फोटो काढू शकतो. आधी आपल्याला आपला फोटो काढण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीच्या मदतीची गरज होती. मात्र सेल्फीने दुसऱ्या व्यक्तीवरील अवलंबित्व पूर्णपणे संपवले आहे. आता आपण जिथे हवं तिथे, जशी हवी तशी सेल्फी काढू शकतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशातच जर कोणी तुम्हाला सांगितले की एखाद्याने स्वतःच्या सेल्फी विकून करोडो रुपये कमावले आहेत तर साहजिकच तुम्हाला विश्वास बसणार नाही. तुम्ही हाच विचार कराल की आपण स्वतःची सेल्फी विकून पैसे कसे काय कमावू शकतो. पण नुकतंच इंडोनेशियामधून एक हैराण करणारे प्रकरण समोर आले आहे. इंडोनेशियामध्ये एका सामान्य विद्यार्थ्याने आपले फोटो विकून करोडो रुपये कमावले आहेत. त्यामुळेच सध्या जगभरात त्याची चर्चा होतेय. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की नेमके हे झाले कसे?

‘हे’ अ‍ॅप वापरून दुसऱ्या ठिकाणाहूनही नियंत्रित करू शकता आपला फोन आणि लॅपटॉप

अनेकांना तर हा प्रश्न पडला आहे की त्या विद्यार्थ्यांच्या फोटोमध्ये नेमकं असं काय आहे ज्याच्यामुळे तो करोडपती बनला. इंडोनेशियायी कॉलेजच्या विद्यार्थ्याने एनएफटीच्या माध्यमातून करोडो रुपये कमावले आहेत. एनएफटीअंतर्गत त्याने आपल्या सेल्फीचे डिजिटल अधिकार विकले आहेत. या विद्यार्थ्यांचे नाव सुलतान गुस्ताप अल घोजाली असे असून तो सेमारंग प्रांतात राहतो.

अधिक माहितीनुसार, या विद्यार्थ्याने मागील पाच वर्षांपासून प्रत्येक दिवशी आपल्या कम्प्युटर समोर बसून जवळपास १००० पेक्षा जास्त सेल्फी काढल्या आहेत. या विद्यार्थ्याने जेव्हा ब्लॉकचेन तंत्रज्ञान समजून घेतले तेव्हा त्याने आपल्या सेल्फी एनएफटीच्या मदतीने विकायच्या ठरवल्या. जेव्हा घोजालीच्या सेल्फीची मागणी वाढली तेव्हा क्रिप्टोकरन्सी इथरच्या ($८०६) ०.२४७ मध्ये एक सेल्फी उपलब्ध होता. विद्यार्थ्याने पुढे सांगितले की, त्याने डिसेंबरमध्ये सेल्फी अपलोड करण्यास सुरुवात केली.

Facebook आणि Instagram वर येणार नवीन फिचर; खरेदी-विक्रीसाठी उपलब्ध होणार आकर्षक पर्याय

त्यानंतर एका शेफने त्याचा प्रचार केला. यामुळे या फोटोच्या विक्रीमध्ये तेजी आली. या योजनेमुळे हा विद्यार्थी आता करोडपती बनला आहे. घोजालीने सांगितले, सुरुवातीला त्याच्या मनात फक्त एवढंच होतं की लोकांनी त्याच्या सेल्फी गोळा केल्या तर तो फक्त विनोद असेल. त्या काळात त्यांनी एका फोटोची किंमत $3 ठेवली होती. नंतर त्याची योजना हिट झाली आणि त्याने १ दशलक्ष डॉलर्स जमा केले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Student earns rs 7 crore by selling selfies pvp
First published on: 21-01-2022 at 16:01 IST