परीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करणारे विद्यार्थी परीक्षागृहात गेल्यावर टेंशनमध्ये असतात. कारण प्रश्नपत्रिकेत नेमके कोणते प्रश्न विचारण्यात आले आहेत, असं टेंशन विद्यार्थ्यांना सतावत असतं. पण एका इंटरमीडिएट परीक्षेत काहीसं वेगळं घडलं. बिहारमधील एक विद्यार्थी इंटरमीडिएट परीक्षा देण्यासाठी परीक्षागृहात पोहोचला अन् चक्कर येऊन खाली पडला. त्यामागचं कारणही भन्नाट आहे. गणिताची परीक्षा देण्यासाठी गेलेल्या या मुलाने ५०० मुलींमध्ये आपण एकटाच मुलगा असल्याचं दृष्य पाहिलं. मनिष शंकर प्रसाद (१७) असं या मुलाचं नावं आहे. परीक्षागृहातील ते दृष्य पाहून मनिषला धक्का बसला आणि त्याची प्रकृती बिघडली. एव्हढच नव्हे, तर डोकेदुखी आणि तापाचा त्रास होऊ लागल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

सुंदरगडच्या ब्रिलिएंट कॉन्वेंट शाळेत इंटरमीडिएट परीक्षा घेण्यात आली. पण पहिल्याच दिवशी परीक्षेला गेलेल्या मनिषला मात्र परीक्षागृहातील दृष्य पाहून धक्काच बसला. कारण ५०० मुलींमध्ये तो एकटाच परीक्षा देण्यासाठी परीक्षागृहात बसला होता. हे दृष्य पाहून त्याच्यी प्रकृती बिघडली. मनिषला चक्कर आल्यानंतर त्याला उपचारासाठी तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आले. ५०० मुलींमध्ये मनिष एकटाच परीक्षागृहात असल्याने तो अस्वस्थ झाला होता, अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी दिली. ” मनिष पेपर देण्यासाठी गेला होता. पण परीक्षागृहातील दृष्य पाहून तो अस्वस्थ झाला होता. मनिषला ताप, डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने त्याला चक्कर आली, असं त्याचे नातेवाईक पुश्पलता यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं.

Buldhana, Minor Girl, sexually Tortured, Case Registered, female friend,
बुलढाणा : अल्पवयीन मुलीला डांबून दहा दिवस अत्याचार; मैत्रिणीनेच दिला दगा….
Viral Video Teacher Getting Gift From His Student Thought it was a photograph but then turned out to be a sketch
VIDEO: विद्यार्थ्याने दिलं ‘असं’ खास सरप्राईज की, शिक्षकाला डोळ्यावर बसेना विश्वास; भेटवस्तू पाहून म्हणाले…कलाकार
Viral video when Father saw daughter in bridal look his emotional reaction capture in video goes viral on social media
वडिलांचे प्रेम! लाडक्या लेकीला नवरीच्या रुपात पाहून भावूक झाले वडील, मुलीवर केला कौतुकाचा वर्षाव; नेटकरी म्हणाले, “एवढं कौतुक फक्त वडिलच…”
santhan rajiv gandhi case convict
राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषीचा सुटकेनंतर दोन वर्षांनी मृत्यू; आरोपी संथन कोण होता?

नक्की वाचा – Viral Video: भरधाव कारची दुचाकीला धडक, दुचाकी ४ किमीपर्यंत फरपटत गेली, रस्त्यावरील बर्निंग थरार व्हायरल

या घटनेसाठी मनिषच्या पालकांनी आणि स्थानिक रहिवाशांनी शाळेतील अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं. पण शाळेतील अधिकाऱ्यांनी असा दावा केला की, “मनिषने त्याचं नाव फिमेल जेंडर मध्ये नोंदवलं असेल आणि त्यामुळेच त्याला इतर सर्व मुलींप्रमाणे परीक्षागृहात पेपर देण्याची परवानगी मिळाली असेल.” तसंच या घटनेबाबत परीक्षागृहातील मुख्याध्यापक शशी भुषण प्रसाद यांनी म्हटलं की, मुलाने त्याचे जेंडर फिमेल असं लिहिल्यानंतर त्यात बदल करायाला पाहिजे होता. चुकीच्या गोष्टींमध्ये फेरबदल करण्यासाठी २० दिवसांचा कालावधी विद्यार्थ्यांना देण्यात आला होता. त्याच्या पालकांनी किंवा त्याने ही गंभीर चूक केली असावी.” ही इंटरमीडिएट परीक्षा एकूण १३.१८ विद्यार्थी देत आहेत. या परीक्षेसाठी बसलेल्या मुलींची संख्या ६,३६,४३२ आहे. तर ६,८१,७९५ इतकी मुलं ही परीक्षा देत आहेत.