आजकाल मुलांचा संयम पूर्णपणे कमी होताना दिसतोय. शाळा, महाविद्यालात शिक्षण घेणारी ही मुलं रागाच्या भरात कोणालाही सरळ उलट बोलतात, काहीवेळा कोणावर हात उगारतानाही ती मागे-पुढे पाहत नाहीत. त्यांच्या अशा या बेशिस्त वागण्यामुळे पालकांसह इतरांनाही त्रास होतो. सध्या अमेरिकेतील बेशिस्त विद्यार्थ्यांचा असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो पाहून कुणालाही धक्का बसेल, कारण यात दोन विद्यार्थिनींच्या भांडणात शिक्षिकेला चक्क लोखंडी खुर्ची फेकून मारण्यात आली आहे. कोणीही कल्पना करु शकत नाही अशाप्रकारचे वर्तन विद्यार्थिनींनी शिक्षिकेबरोबर केले आहे.
काही मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना फ्लिंट साउथवेस्टर्न अकादमी हायस्कूलमध्ये घडली आहे. त्याच झालं अस की, दोन विद्यार्थिनींमध्ये भांडण झालं आणि दोघीही क्लासरुममध्ये एकमेकांवर जोरजोरात ओरडून बोलू लागल्या. यावेळी शिक्षिकेने मध्यस्थी करत दोघींना शांत करण्याचा प्रयत्न केला. पण हे भांडण कितपत वाढत जाईल याची शिक्षिकेलाही कल्पना नव्हती.




व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक शिक्षिका दोघींसमोर उभी आहे आणि त्यांना काहीतर समजावत आहे. यावेळी उजव्या बाजूला उभ्या असलेल्या विद्यार्थीनीला अचानक राग येतो आणि ती खुर्ची उचलून शिक्षिकेवर फेकते. खुर्ची आदळताच शिक्षिका जमिनीवर कोसळत जखमी होते पण कोणीही तिची मदती करण्यासाठी पुढे येत नाही.
@libbyemmons या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. जो पाहून अनेकांना धक्का बसला आहे. यावर अनेक युजर्सनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले की, विद्यार्थिनीने जे केले ते पूर्णपणे चुकीचे आहे, यामुळे तिला शाळेतून काढून टाकले पाहिजे. दुसऱ्या एका युजरने लिहिले की, हा हल्ला असून शिक्षकेच्या मेंदूला इजा झाली असू शकते. हा व्हिडिओ शेअर करून अमेरिकन राजकारणी तिथल्या शिक्षण व्यवस्थेवर आता प्रश्न उपस्थित करत आहेत.