शाळेत अनेकदा कवायत, समूहगीताचा सराव, क्रीडामहोत्सव यांचे आयोजन शाळेच्या मैदानात करण्यात येते. सर्व विद्यार्थी शाळेच्या मैदानावर एकत्र जमून, या गोष्टींचा अनुभव घेतात. पण, आज सोशल मीडियावर एक अनोखा व्हिडीओ पाहायला मिळाला आहे; ज्यात सकाळी शाळेत एक खास गोष्ट करण्यात आली आहे.सर्व विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र मिळून हनुमान चालिसाचे पठण करताना दिसले आहेत.
व्हायरल व्हिडीओ एका शाळेतील आहे. शाळेच्या मैदानात सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनी गणवेश घालून रांगेत उभे आहेत. तसेच व्हिडीओतील खास गोष्ट अशी की, पेटीच्या तालावर हनुमान चालिसाचे पठण करण्यात येत आहे. माईकवर एक व्यक्ती हनुमान चालिसा म्हणते आहे आणि तिच्यामागून शाळेतील सर्व विद्यार्थी हात जोडून हनुमान चालिसा म्हणताना दिसत आहेत. यादरम्यान सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या चपलासुद्धा बाजूला काढून ठेवल्या आहेत. शाळेत विद्यार्थ्यांकडून कशा प्रकारे हनुमान चालिसाचे पठण करून घेतले जात आहे एकदा तुम्हीसुद्धा व्हिडीओतून बघाच…
व्हिडीओ नक्की बघा :
रांगेत उभे राहून विद्यार्थ्यांनी केले हनुमान चालिसाचे पठण :
शाळेत सकाळी एक अनोखा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. शाळेतील मैदानात विद्यार्थिनी आणि त्यांच्यामागे विद्यार्थी असे गट करून, त्यांना रांगेत उभे करण्यात आले आहे. त्यानंतर शाळेतील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक एकत्र मिळून हनुमान चालिसाचे पठण करताना दिसले आहेत. अनेक विद्यार्थी डोळे मिटून हात जोडून हनुमान चालिसा म्हणताना दिसत आहेत. तसेच शिक्षक आणि शिक्षिका यादरम्यान सर्व विद्यार्थ्यांचे निरीक्षण करताना दिसून आले आहेत. शाळेच्या मैदानात उपस्थित असलेल्या एका व्यक्तीने तिच्या मोबाईलमध्ये या खास क्षणाचा व्हिडीओ काढून घेतला आहे.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ @chaprazila या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. तसेच ” शाळेत हनुमान चालिसाचे पठण करणारे विद्यार्थी “, अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. या एक्स (ट्विटर) अकाउंटवर अनेक सुंदर व्हिडीओ पोस्ट केले जातात. त्यातच आज त्यांनी विद्यार्थी हनुमान चालिसाचे पठण करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. सकाळी शाळेत मैदानावर एकत्र येऊन विद्यार्थी हनुमान चालिसाचे पठण करताना दिसून आले आहेत.
