एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वेगात जाणारे विमान तुम्ही आतापर्यंत अनेक चित्रपटात पाहिले असतील. आपल्या डोळ्याची पापणी ही लवते न लवतेच ही विमाने इतक्या जबरदस्त वेगात कुठल्या कुठे पोहोचलेली असतात. पण हे फक्त चित्रपटातच शक्य आहे, असं अनेकजण बोलून जातात. असा विचार तुम्ही सुद्धा करत असाल तर आता हा विचार बदला. कारण हाच थरार प्रत्यक्षात पहायला मिळालाय. एखाद्या चित्रपटात दाखवतात तसं अवघ्या काही सेकंदामध्ये एका बोगद्यातून दुसऱ्या बोगद्यात विमान उडवून अनोखा विश्वविक्रम रचलाय. हे कसं शक्य आहे? असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा थरकाप उडवणारा व्हिडीओ एकदा पाहाच.

रेड बुल स्टंट पायलट डॅरिओ कोस्टा याने हा विश्वविक्रम रचलाय. तुर्कीच्या इस्तंबुलमधील दोन बोगद्यांमधून १५० मैल प्रति तासाहून अधिक वेगाने विमान उडवून या वैमानिकाने एक नव्हे तर दोन नव्हे तर तर तब्बल पाच वर्ड रेकॉर्ड आपल्या नावे केले आहेत. ३६० मीटर लांबीच्या एका बोगद्यातून तीन फूट उंचीवरून या वैमानिकाने हे विमान उडवले. त्यानंतर ११६० मीटर लांबीच्या दुसर्‍या बोगद्यातूनही त्याने आरपार विमान उडवलं. दोन्ही बोगद्यातील एकूण ५२०० फुटांचे अंतर त्याने अवघ्या ४३.४४ सेकंदात पार केले.

आणखी वाचा : उकळत्या पाण्यात ध्यान करत बसलेल्या मुलाचा व्हिडीओ व्हायरल; नेटकऱ्यांचा फसवेगिरीचा दावा

 

View this post on Instagram

 

A post shared by Red Bull (@redbull)

आणखी वाचा : हा भयावह दिसणारा २० फूटाचा साप होतोय व्हायरल

विशेष बाब म्हणजे उलट दिशेने सुटलेल्या वाऱ्यामुळे विमान हवेत हेलकावे घेत असून त्याने हा यशस्वी विक्रम रचलाय. तब्बल पाच वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावे केल्याचा आनंद या वैमानिकेला गगनात मावेनासा झाला. ५२०० फूटाचं अंतर केवळ ४३.४४ सेकंदात पार केल्यानंतर या वैमानिकाने विमान आणखी वर नेत ३६० डिग्रीने फिरवर हा आनंद साजरा केला.

पायलट डॅरिओ कोस्टा याच्या पराक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आलीय. सर्वात प्रथम एका बोगद्यातून विमान उडवल्याचा, सर्वात जास्त लांबीच्या बोगद्यातून विमान उडवल्याचा, सर्वात जास्त वेळ विमान उडवल्याचा, पहिल्यांदाच दोन बोगद्यामधून विमान उडवल्याचा आणि पहिल्यांदा एका बोगद्यात विमानाचे टेक ऑफ केल्याचा असे एकूण पाच वर्ल्ड रेकॉर्ड या वैमानिकाने आपल्या नावे केले आहेत.