Viral Video: सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल ते सांगता येत नाही. अनेकदा त्यावर अपघाताचेही अनेक व्हिडीओ व्हायरल होताना आपण पाहतो. जे समोर येताच काही क्षणांत लाखो व्ह्युज आणि लाइक्स मिळवतात. बऱ्याचदा अपघात हे स्टंट करण्यामुळे होतात. त्यावर नेटकरी तीव्र संतापदेखील व्यक्त करताना दिसतात. अशा विविध प्रकारच्या स्टंटमुळे अनेकांनी आजपर्यंत आपला जीव गमावला आहे. दरम्यान, नुकताच असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

समाजमाध्यमांच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या वापरामुळे लोकांच्या मानसिकतेवर वाईट परिणाम होताना दिसत आहे. नवनवीन ट्रेंड्सवर अनेकांचे अचूक लक्ष असते. या ट्रेंडनुसार लोक गाणी, रील्स, व्हिडीओ बनवताना दिसतात. अनेकदा आपल्याला भरपूर प्रसिद्धी मिळावी यासाठी ते कोणत्याही थराला जातात. ज्यात कोणी स्वतःचा जीव धोक्यात घालत असतो, तर कोणी कसलीही पर्वा न करता अश्लील चाळे करताना दिसतात. अशा प्रकारचे अनेक व्हिडीओ आपण पाहिलेच असतील.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रात्रीच्या वेळी हायवेवर दोन तरूण बाईकवरून प्रवास करत असून यावेळी या दोघांमधील मागे बसलेला तरुण चालू बाईकच्या सीटवर उभा राहून आपले हात हवेत फिरवताना दिसतोय. बराचवेळ तो हा जीवघेणा स्टंट करतो. त्यानंतर तो सीटवर बसण्यासाठी खाली वाकतो पण इतक्यात त्याचा पाय सीटवरून सटकतो आणि तो समोरच्या व्यक्तीला पकडून बाईकसकट रस्त्याच्या कडेला जोरात पडतो. या जीवघेण्या स्टंटच्या नादात दोघांनाही गंभीर दुखापतीचा सामना करावा लागल्याचे दिसत आहे.

हा व्हिडीओ युट्यूबवरील @AkshayKhedkar94 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून यावर आतापर्यंत अनेक व्ह्युज आणि लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच अनेक युजर्स यावर कमेंट्स करताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ:

युजर्सच्या कमेंट्स चर्चेत

एका युजरने या व्हिडीओवर लिहिलेय, “असंच पाहिजे यांना”, तर दुसऱ्या युजरने लिहिलंय की, “कशाला असा मूर्खपणा करायचा”, तिसऱ्या युजरने लिहिलेय, “असं करण्याआधी आई-बापाचा चेहरा आठवत जा”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “खूप खतरनाक स्टंट”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “आईने तुला जन्म देऊन चूक केली…”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “बरं झालं हे पाहून समाधान वाटलं”, तर आणखी एकाने लिहिलंय की, “असे लोक कशाला जन्माला येतात काय माहित”, तर एका युजरने लिहिलंय की, “देशाला लागलेली वाळवी आहे ही, अशांना देशाच्या बाहेर काढा”