scorecardresearch

video: एवढा भीषण अपघात की गाडीच्या मधोमध घुसला लोखंड, चालकाची अवस्था पाहून बसणार नाही विश्वास

व्हिडीओतील कारची अवस्था पाहून तुम्हालाही हसू येईल.

भीषण अपघातात गाडीच्या चालकाला अंगावर एकही ओरखडा आलेला नाही.(photo: Video Screen Grab / punjabi_industry / Instagram )

देव ज्याला वाचवतो त्याला कोणीही नुकसान पोहचवू शकत नाही असे म्हणतात. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओमध्ये पाहायला मिळाला. हायवेवर ज्या प्रकारे कारचा अपघात झाला त्याचा व्हिडीओ पाहून तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटेल. कारण या अपघातात ड्रायव्हरला अंगावर एकही ओरखडा पडला नाही.

व्हिडीओमध्ये तुम्ही बघू शकता की एक कार नियंत्रणाबाहेर गेली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या गार्ड रेलला धडकली. गार्ड रेल गाडीच्या मधोमध शिरते आणि गाडीला फाडून पन्नास फूट आत गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. पण व्हिडीओतील कारची अवस्था पाहून तुम्हालाही हसू येईल. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ जास्त लोकांनी पाहिला आहे.

कारचा भीषण अपघात

कारचा अपघात एवढा भीषण होता की, गार्ड रेल कारच्या मधूनच शिरल्याचे व्हिडीओत पाहायला मिळतय. तुम्ही पाहू शकता की या अपघातात ड्रायव्हरची सीट सुरक्षित आहे, दरम्यान गार्ड रेल उर्वरित कार मध्यभागी फाडते. मात्र सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे एवढ्या धोकादायक अपघातानंतरही गाडीच्या चालकाला काहीच झाले नाही.

व्हिडीओमध्ये तुम्ही गाडीचा चालक पाहू शकता की, या भीषण अपघातात गाडीच्या चालकाला अंगावर एकही ओरखडा आलेला नाही. अपघातानंतर चालक गाडीतून उतरून रस्त्याच्या कडेला बसतो. व्हिडिओमध्ये तुम्ही गाडीचा ड्रायव्हर इतरांसोबत आरामात बसलेला पाहू शकता. इन्स्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर punjabi_industry नावाच्या पेजवरून हा व्हिडिओ अपलोड करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Such a dreadful accident that iron entered middle of the car but driver is safe scsm

ताज्या बातम्या