World Wildlife Day 2024: वन्यजीव म्हणजेच वनात राहणारे जीव – प्राणी, वनस्पती, कीटक, पक्षी, वृक्ष आदी; तर आज ३ मार्च हा दिवस ‘जागतिक वन्यजीव दिन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी वन्यजीवांचे संरक्षण, अन्नसाखळीतील वन्यजीवांचे महत्त्व समजवून सांगण्यात येते, तर अशातच प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त शुभेच्छा देत वाळुत खास कला सादर केली आणि व्याघ्र संवर्धनचा संदेश दिला आहे.

ओडिशातील प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांनीही ट्विटरवरून एक खास गोष्ट शेअर केली आहे आणि जागतिक वन्य जीव दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. सुदर्शन पटनायक यांनी वाळुत घनदाट जंगलात झोपलेल्या वाघाचे ५० फूट लांब वाळूशिल्प रेखाटले आहे. ५० फूट लांब काढलेल्या या वाळूशिल्पात तुम्हाला वाघाची हुबेहूब काढलेली शेपटी, पंजे, त्याचे डोळे आदी अनेक वैशिष्ट्ये दिसून येतील. एकदा पाहाच हे खास वाळूशिल्प.

हेही वाचा…तरुणीने वस्तूंच्या साकारल्या ‘अशा’ थ्रीडी रांगोळ्या; खरे की खोटे ओळखणे कठीण, पाहा VIDEO

व्हिडीओ नक्की बघा…

ओडिशातील प्रसिद्ध वाळू कलाकार पद्मश्री पुरस्काराने सन्मानित आहेत. तसेच प्रत्येक खास दिनानिमित्त ते विविध वाळूशिल्प साकारत असतात. तर आज सुदर्शन पटनायक यांनी महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा महोत्सव २०२४ मध्ये सहभाग घेतला आणि हे खास वाळूशिल्प साकारले आहे. तसेच या साकारलेल्या शिल्पाच्या खाली ‘वाघ वाचवा’ असा संदेश देण्यात आला आहे. घनदाट जंगलात वसलेल्या वाघाचे चित्तथरारक ५० फूट लांबीचे वाळूचे शिल्प पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल आणि प्रसिद्ध वाळू कलाकाराचे कौतुक कराल.

सोशल मीडियावर ही पोस्ट सुदर्शन पटनायक यांच्या @sudarsansand या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे व या पोस्टला “महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात ५० फूट लांब वाघचे सँडआर्ट काढले”; अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे. सोशल मीडियावर सुदर्शन पटनायक यांच्या खास वाळूशिल्पाने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.