scorecardresearch

आधी येऊ लागला धूर, अन् बघताच क्षणी बुलेटने घेतला पेट, सोशल मीडियावर Video Viral

बुलेटची ‘राजेशाही सवारी’ कधी कधी जीव धोक्यात घालणारी सुद्धा ठरू शकते. कारण एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आलाय. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर उभी केलेल्या बुलेटने पेट घेतला आणि डोळ्याची पापणी लवण्याच्या आत जळून खाक झाली. हा व्हिडीओ पाहताना अंगावर शहारे येतात.

Bullet-Fire-Viral-Video
(Photo: Instagram/ shivamudhiraj7640)

मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये आग लागल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. आता इलेक्ट्रिक स्कूटरनंतर बुलेटचं एक प्रकरण समोर आलं आहे. रस्त्यावर उभ्या असलेल्या एका बुलेटला अचानक आग लागल्याची ही घटना आहे. बुलेटमध्ये अचानक आग लागल्यानंतर धूरच धूर निघू लागला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण होऊ लागले आहेत.

हल्ली तरूणांमध्ये बुलेटची क्रेझ मोठ्या प्रमाणात आहे. स्वस्तातल्या फोर व्हिलरपेक्षा महागडी बुलेटमुळे रूबाब वाढतो, असं तरूणांचं म्हणणं असतं. बुलेटची ही ‘राजेशाही सवारी’ कधी कधी जीव धोक्यात घालणारी सुद्धा ठरू शकते. कारण एक धक्कादायक घटनेचा व्हिडीओ सध्या समोर आलाय. या व्हिडीओमध्ये रस्त्यावर उभी केलेल्या बुलेटने पेट घेतला आणि डोळ्याची पापणी लवण्याच्या आत जळून खाक झाली. हा व्हिडीओ पाहताना अंगावर शहारे येतात.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : घराच्या छतावर लपून डान्स व्हिडीओ बनवत होती, अचानक झालं असं काही की…

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्याच्या कडेला एक बुलेट उभी केलेली आहे आणि बाजुने रस्त्यावरून गाड्यांची ये-जा सुरू आहे. सुरूवातीला रस्त्यावर उभी केलेल्या या बुलेटमधून धूर येऊ लागतो. काही वेळाने या बुलेटला अचानक आग लागते आणि काही सेकंदात ती आगीच्या कचाट्यात सापडते. यावेळी रस्त्यावरची लोक सुद्धा जागेवर उभं राहून बुलेटचा आग लागलेली पाहताना दिसून येत आहेत. यातील कुणीही या बुलेटचा लागलेली आग विझवण्यासाठी पुढे येत नाही.

आणखी वाचा : नवरीसमोरच केलं असं काही की खवळला नवरदेव; स्टेजवरच सुरू झाली मारामारी, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : आजीला चॅलेंज करायला निघाला नातू; फक्त २ मिनिटात उतरवलं भूत, पाहा VIRAL VIDEO

या बुलेटला आग नक्की कशामुळे लागली याचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. परंतू हा व्हिडीओ मन हेलावून टाकणारा आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करत लोक बुलेट चालवणाऱ्यांना सावधानतेचा इशारा देत आहेत. नशीब चांगलं की या बुलेटवर त्यावेळी कुणी बसलेलं नव्हतं. जर चालत्या बुलेटला आग लागली असती तर कदाचित चालकाचा जीव धोक्यात आला असता.

आणखी वाचा : केअरटेकरला वाचवण्यासाठी जीवाच्या आकांताने धावला हत्ती, हा VIRAL VIDEO पाहून भावूक व्हाल

हैराण करून सोडणारा हा व्हिडीओ shivamudhiraj7640 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. बघता बघता हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १.२ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर ७१ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक देखील केलंय. लोकांनी या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील शेअर केल्या आहेत. काही युजर्सनी विनोदी अंदाजात या बुलेटला ‘घोस्ट रायडर बुलेट’ असं म्हटलंय. तर काही युजर्सनी वाढत्या उष्णतेमुळे या बुलेटला आग लागल्याचा अंदाज वर्तवलाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Sudden fire broke out in a bike parked on the road side video viral on social media prp

ताज्या बातम्या