…अन् चक्क त्याने जेसीबी थांबवून लहान मुलांच्या खेळण्यात माती ओतली; व्हिडीओ व्हायरल

हा व्हिडीओ बघून त्यातील लहान मुलांचा आनंद बघून तुम्हाला तुमचं बालपण नक्कीच आठवेल.

या व्हिडीओमुळे तुमच्याही चेहऱ्यावर छानस हसू नक्की येईल.

लहान मुलांच्या छोट्या छोट्या इच्छा जरी पूर्ण केल्या तरी मुलांना खूप आनंद होतो. असाच लहान मुलांना आनंद देणारा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. या व्हिडिओतही एका जेसीबी चालकाने मुलांना चांगलच खुश केलं आहे. या व्हिडीओवर नेटीझन्सने खूप प्रेम दर्शवलं आहे. काहींना हा व्हिडीओ आपल्या स्टेटसवर ठेवण्याचा किंवा शेअर करण्याचाही मोह आवरला नाहीये. मुळचा अपवर्थी (Upworthy) या पेजने अपलोड केलेला हा व्हिडीओ मामामिया नावाच्या फेसबुक पेजने पुन्हा अपलोड केला आहे. व्हिडीओ पोस्ट करतांना त्यावर ‘केवळ हे उत्कृष्ट गोंडस नाही तर हा माती ओतणे किती अचूक होत याकरिता आपण थोडा वेळ देऊ शकता” अस कॅपश्न दिल आहे.

काय आहे या व्हिडीओत नक्की?

या व्हिडीओमध्ये एक कामगार आपल्या जेसीबी मधून मुलांसाठी माती घेऊन येतो. मुलं त्यांचे छोटे जेसीबी आणि ट्रक घेऊन रस्त्याच्या बाजूला खेळत आहेत. माती घेऊन आलेल्या खऱ्या जेसीबीला पाहून मुलांना खूप आनंद होतो. ते हाताने इथे आमच्या गाडीमध्ये माती टाका असंही सांगतात. अवघ्या ४८ सेकंदाच्या व्हिडिओने तुमच्याही चेहऱ्यावर हसू नक्की येईल.

 नेटीझन्सच्या  प्रतिकिया

या व्हिडीओवरती आतापर्यंत जवळ जवळ ५० हजार लोकांनी कमेंट केल्या आहेत. तर २५२ हजार लोकांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. १.५ दशलक्ष लोकांना हा व्हिडिओ आवडला आहे हे त्यांनी लाईक करून सांगितला आहे. एका युजरने “काही वेळा, माणुसकी ही सर्वात आश्चर्यकारक गोष्ट ठरते. या मुलांचा दिवस उज्वल करण्यासाठी ज्याने वेळ दिला त्या कामगारांचे मी कौतुक करते.” तर काहींना हा व्हिडीओ बघून स्वतःच बालपण आठवलं “मी लहान असताना या मशीन्सचे काम पाहात खूप तास बसायचो आणि मला आजही हे पहायला खूप आवडते. हे जर माझ्या बाबतीत घडले असते तर ते  अमेझिंग ठरले असते. काही युजरला मात्र हा व्हिडीओ आवडला नाही. एका युजरने “त्या ऑपरेटरला त्वरित काढून टाकले पाहिजे! त्याने त्या मुलांचा जीव धोक्यात घातला. एक चुकीची चाल दुःखद ठरू शकते.” अशी कमेंट केली.

 

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Suddenly jcb stopped and poured soil into the childrens toys video goes viral ttg