wooden carrom coins making viral video : मोबाईल, संगणक, टीव्ही, व्हिडीओ गेम्समध्ये आजकालची मंडळी इतकी रमली आहेत की, लपाछुपी, बॅडमिंटन, डोंगर का पानी, व्यापार, लुडो अगदी कॅरम हे सगळे खेळ सुद्धा पडद्याआड जाऊ लागले आहेत. असे खेळ खेळल्याने मन सुद्धा रमतं आणि मित्र-मैत्रिणींनी किंवा कुटुंबातील व्यक्तींनाही काही वेळासाठी का होईना एकत्र आणतं. तर आज सोशल मीडियावर याच आठवणींमध्ये पुन्हा घेऊन जाणारा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे. यामध्ये कॅरमच्या सोंगट्या कशा बनवल्या जातात याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
या व्हिडीओमध्ये लाकडापासून कॅरमच्या सोंगट्या तयार करण्याची संपूर्ण प्रक्रिया दाखवली आहे. गुलाबी, काळ्या आणि पांढऱ्या सोंगट्या बनवण्यासाठी सगळ्यात आधी लाकूड कापणे, त्याला सोंगट्या बनवण्यासाठी योग्य आकार देणे. त्यांना गुळगुळीत करणे आणि शेवटी त्याला परफेक्ट फिनिशिंग देऊन विक्रीसाठी बाजारात पाठवून देतात. प्रत्येक टप्पा अतिशय अचूक आणि कौशल्यपूर्ण आहे. ही प्रक्रिया पाहताना समाधान आणि कामगाराच्या मेहनतीचे कौतुक दोन्ही वाटते.
“आजकालची पिढी कॅरम ऑनलाईन खेळती” (Viral Video)
घरात मित्रांबरोबर खेळण्याऐवजी, आता लोक ॲपवर कुठल्याही व्यक्तीसोबत कधीही आणि कुठूनही कॅरम ऑनलाईन खेळतात. त्यामुळे खेळ सोपा आणि पटकन उपलब्ध झाला आहे, पण प्रत्यक्ष एकत्र बसून खेळण्याची मजा आणि भावना थोडी कमी झाली आहे. त्यामुळे व्हायरल व्हिडीओ तुम्हाला पुन्हा जुन्या आठवणींकडे घेऊन गेला आहे. जिथे गुलाबी रंगाची सोंगटी (राणी) जिंकण्यासाठी कॅरम खेळतानाची वेळ तुम्हालाही नक्कीच आठवली असेल. कॅरमच्या सोंगट्या बनवण्याची पद्धत व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
व्हिडीओ नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @kamalesh_sarkar98 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून नेटकरी”गुलाबी रंगाची सोंगटी सगळ्यात आवडती असते”, “आजकालची पिढी कॅरम बोर्डवर बसून खेळण्यापेक्षा मोबाईलवर ऑनलाइन कॅरम खेळायला जास्त पसंती देते”, “ओके थँक यू. आपलं बालपणाचं उन्हाळा या कॅरमच्या कॉइन्सशिवाय कधीच पूर्ण व्हायचं नाही. आज हे कसं बनवतात ते पाहिलं” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत…
