सनी देओलने चाहत्यांना म्हटले गुड मॉर्निंग, मग मागे उभ्या असलेल्या गायीनेही दिले उत्तर, पहा मजेशीर video

सध्या सनी देओल ‘गदर २’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी अमिषा पटेलसोबत हिमाचल प्रदेशला पोहोचला आहे. याच दरम्यानचा त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Sunny Deol funny video
व्हायरल व्हिडीओ (फोटो: @iamsunnydeol / Instagram )

सनी देओल त्याच्या दमदार आवाज आणि जबरदस्त डायलॉग डिलिव्हरीसाठी बॉलिवूडमध्ये ओळखला जातो. सनी देओलचे चित्रपटांमध्ये बोलले जाणारे संवाद आजही चाहत्यांच्या ओठावर आहेत. बॉलिवूडच्या सुपरस्टार कलाकारांच्या यादीत सनी देओलचे नाव सामील आहे. आपल्या जबरदस्त अभिनयासोबतच सनी देओल त्याच्या लाजाळू स्वभावासाठी देखील ओळखला जातो. सनी देओल सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि तो अनेकदा स्वतःचे आणि त्याच्या कुटुंबाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करतो. पुन्हा एकदा सनी देओलने तिचा एक लेटेस्ट व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये सनी देओल हिमाचलच्या सौंदर्यादरम्यान चाहत्यांना गुड मॉर्निंग म्हणताना दिसत आहे.

‘गदर २’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा व्हिडीओ

सनी देओलने त्यांच्या अधिकृत इन्स्टा हँडलवर एक लेटेस्ट व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सनी देओल हिमाचलच्या सौंदर्यात चाहत्यांना गुड मॉर्निंग म्हणताना दिसत आहे. सध्या सनी देओल ‘गदर २’ चित्रपटाच्या शूटिंगसाठी अमिषा पटेलसोबत हिमाचल प्रदेशला पोहोचला आहे. यादरम्यान सनी देओलने सकाळचा वर्कआउट केला आणि त्यानंतर इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये सनी देओल त्याच्या चाहत्यांना इंस्टाग्रामच्या माध्यमातून गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देत आहे. त्याने चाहत्यांना सांगितले आहे की त्याने खूप चांगली कसरत केली आहे आणि मला खूप चांगले वाटत आहे. त्याच्या या व्हिडीओमध्ये सनी देओलने ब्राऊन कलरचा टी-शर्ट घातला आहे.

( हे ही वाचा: रिकाम्या ऑफिसमध्ये तरुणीने केलं असं काही की, CCTV फुटेज पाहून नेटीझन्स झाले थक्क )

याशिवाय त्याच्या खांद्यावर स्वेटर दिसत आहे. इतकंच नाही तर सनी देओल हिमाचलच्या बर्फवृष्टीमध्ये टोपी घातलेला दिसत आहे. या व्हिडीओच्या पार्श्वभूमीवर बर्फाची चादर झाकलेले पर्वत दिसत आहेत, जे हिमाचलच्या सौंदर्याचे वर्णन करण्यासाठी पुरेसे आहे.

( हे ही वाचा: Gold-Silver Rate Today: सोने झाले स्वस्त तर, चांदी महागली; जाणून घ्या आजचा १० ग्रॅमचा भाव )

( हे ही वाचा: बकरी फाइल घेऊन पळाली आणि ऑफिसमधले कर्मचारी बसले उन शेकत; व्हिडीओ व्हायरल )

व्हिडीओ वेगळ्याच कारणाने आला चर्चेत

हिमाचल प्रदेशच्या सौंदर्यात सनी देओल त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. यादरम्यान, त्याने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओसह, त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की ‘गाय आणि मी म्हणत आहे एक चांगला दिवस आहे’. वास्तविक या व्हिडीओमध्ये सनी देओल सर्वांना गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देत असताना मागून मोठ्याने गायीचा मोठ्याने ओरडण्याचा आवाज आला. आपल्या आवडत्या अभिनेत्याला पाहून सोशल मीडियावर चाहत्यांचा जल्लोष पाहण्यासारखा आहे. सनी देओलच्या एका चाहत्याने विनोदी कमेंट करताना लिहिले की, ‘तुम्ही तिकडे गेला असाल तर हातपंप घेऊन ये, मी तुमच्या घरून घेऊन जाईल’. याशिवाय त्याच्या दुसऱ्या चाहत्याने लिहिले की, ‘गदर २’ ची आतुरतेने वाट पाहत आहे. त्याच्या एका चाहत्याने त्याला बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हटले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sunny deol says good morning to fans then the cow standing behind also answers watch funny video ttg

ताज्या बातम्या