Supali Sonyachi Song Girl Dance Video: सोशल मीडियावर रोज असंख्य व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडीओ त्यांच्या वेगळ्या अंदाजामुळे नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतात. सध्या अशाच एका चिमुकलीच्या भन्नाट डान्स रीलची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. डान्सपेक्षा त्याच्या शेवटच्या एक्सप्रेशनने नेटकऱ्यांना अक्षरशः खळखळून हसवलं आहे. सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या ‘सुपली सोन्याची’ या मराठी गाण्यावर या दोघींनी डान्स रिल बनवली आहे. या मुलींनी व्हिडीओजरी ट्रेंडिंग गाण्यावर बनवला असला तरी सोबतच्या छोट्या मुलीचे एक्सप्रेशन्स मात्र भन्नाट आहेत.

इन्स्टाग्रामवर shravyaaa.shetty या अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये एक चिमुकला उत्साहात डान्स करताना दिसतो. सुरुवातीपासूनच त्याच्या हालचाली आणि एक्सप्रेशन्स लक्ष वेधून घेतात. मात्र डान्स संपताना तो देतो तो खास ‘आऽऽऽह’ वाला एक्सप्रेशन पाहण्यासारखा आहे.

हा व्हिडीओ पाहून अनेकांनी कमेंट्समध्ये हसण्याचे इमोजी टाकले आहेत. एका युजरने ‘Look at tongue, I can’t stop my laugh seriously’ अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे. तर _aj_mhatre यांनी या चिमुकल्याला ‘Chota don’ असं म्हटलं आहे. अगदी साध्या साड्यांमध्ये निव्वळ टाइमपास म्हणून हा व्हिडीओ दोघींनी केल्याचं दिसत आहे. मात्र या चिमुकलीच्या हावभावांनी हा व्हिडीओ चांगलाच गाजला आहे.

व्हिडीओतील चिमुकल्याचा कॉन्फिडन्स, डान्सची स्टाइल आणि शेवटचा मजेशीर अंदाज नेटकऱ्यांना चांगलाच भावला आहे. त्यामुळेच कमेंट सेक्शनमध्येही त्याचं कौतुक आणि मजेशीर प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत.

डान्स तर अनेक जण करतात; पण शेवटचा असा भन्नाट एक्सप्रेशन देण्यासाठी लागतो तो वेगळाच स्वॅग! चिमुकल्याचा हा ‘छोटा डॉन’ अंदाज सध्या सोशल मीडियावर नेटकऱ्यांचं मनोरंजन करत आहे.